Pranit More Comeback In Bigg Boss House: बिग बॉस 19 (Bigg Boss 19) च्या घरातून डेंग्यू (Dengue) झाल्यामुळे प्रणीत मोरेला (Pranit More) घराबाहेर जावं लागलेलं. प्रणीत घराबाहेर गेला आणि घरातल्या त्याच्या मित्रांसह त्याच्या चाहत्यांचाही हिरमोड झाला. प्रणीत मोरेला परत आणा, प्रणीत घराबाहेबर गेल्यापासून मन लागत नाही, अशी अनेक आर्जवं चाहत्यांकडून केली जात होती. तेवढ्यात बिग बॉसच्या (Bigg Boss) खबरी पुरवणाऱ्या सोशल मिडिया हँडलवर प्रणीत मोरे पुन्हा घरात एन्ट्री घेणार (Praneet More Enter In BB House) असल्याचं ट्वीट आलं आणि चाहते खूश झाले. तेव्हापासूनच प्रणीतची एन्ट्री पाहण्यासाठी चाहते आतुर झालेले. कधी एकदा प्रणीत घरात येतोय, असं सर्वांना झालेलं. अखेर चाहत्यांची प्रतिक्षा संपली आहे. जिओ हॉटस्टारवर (Jio Hotstar) बिग बॉस 19 चा नवा प्रोमो शेअर करण्यात आलाय. या प्रोमोमध्ये प्रणीत मोरेची धमाकेदार एन्ट्री दाखवली आहे.
'बिग बॉस 19'च्या घरात चाहत्यांचा आवडता कॉमेडियन प्रणित मोरे पुन्हा एकदा दणक्यात एन्ट्री घेणार आहे. काही दिवसांपूर्वी प्रणित मोरेनं डेंग्यूमुळे शो सोडलेला, कॅप्टन्सी टास्क जिंकल्यानंतर लगेचच तो मेडिकल इमर्जन्सीमुळे घराबाहेर गेल्यामुळे त्याच्या जाण्यानं स्पर्धकांना आणि चाहत्यांना धक्का बसला. पण, आता तो परत येतोय, त्यामुळे चाहते भलतेच खूश झाले आहेत.
शुक्रवारच्या एपिसोडमध्ये प्रणीत मोरे घरात एन्ट्री करणार आहे. नव्या प्रोमोमध्ये असं दिसतंय की, प्रणीत मोरे स्टोअर रूममधून परत येईल. जेव्हा स्टोअरची बेल वाजते, तेव्हा नीलम गिरीला समजतं की, कोणीतरी तिथे लपलंय, ज्यामुळे अभिषेक बजाज आणि गौरव खन्ना यांना विश्वास बसतो की, प्रणीत आलाय. त्यानंतर फरहाना आत जाते आणि तिला धक्का बसतो. मृदुल धावत आत येतो आणि ओरडत प्रणीतला मिठी मारतो. काही लोकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसतोय.
'बिग बॉस 19'मध्ये प्रणीत मोरेची वापसी
प्रणीत मोरे घरात फक्त एन्ट्रीच करणार नाही, तर त्याला एक खास पॉवरही देण्यात आली आहे. तसेच, तो घरात आल्यानंतर 'द प्रणित मोरे शो' होस्ट करणार आहे. घरातल्यांना तो पुन्हा एकदा रोस्ट करताना दिसणार आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बिग बॉसनं प्रणीत मोरे परत आल्यानंतर त्याला एक विशेष अधिकार दिला आहे, ज्यामुळे तो एका नॉमिनेटेड सदस्याला घराबाहेर जाण्यापासून वाचवू शकणार आहे. या आठवड्यात गौरव खन्ना, निलम गिरी, फरहाना भट्ट, अशनूर कौर आणि अभिषेक बजाज यांना घराबाहेर जाण्यासाठी नॉमिनेटेड झाले आहेत. चाहते असा अंदाज लावत आहेत की, प्रणीत मोरे गौरव खन्ना किंवा अशनूर कौर या दोघांपैकी एकाला वाचवू शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :