Lonar Lake: सुमारे पाच लाख 80 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे लोणार सरोवराची (Lonar Lake) निर्मिती झाली. बेसॉल्ट खडकात निर्माण झालेलं जगातील हे एकमेव सरोवर...सरोवरातील पाणी हे अत्यंत अल्कधर्मी असल्याने यातच कधीही इतिहासात सजीव सृष्टी आढळल्याची नोंद नाही. सरोवरातील अल्कधर्मी पाणी असल्यामुळे यात कुठलेही मासे किंवा जीव जंतू जगू शकत नाही. मात्र आता लोणार सरोवरातील पाण्याचे गुणधर्म बदलत असल्याने यात सजीव सृष्टी निर्माण होताना दिसत आहे. या सरोवरच चक्क मासे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत.
यंदा या परिसरात मोठ्या प्रमाणात अनेकदा अतिवृष्टी झाली. लोणार (Lonar Sarovar) शहरातील सांडपाणी सरोवरात थेट जाऊ नये म्हणून NEERI संस्थेने याठिकाणी प्रकल्प उभारला होता, तोही धुळखात पडून आहे. शिवाय लोणार शहरातील सांडपाणी सरळ या सरोवरात मिसळल्या जात असल्याने सरोवराची पाण्याची पातळी इतिहासात यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढली. त्यामुळे सरोवराच पाणी हे डायल्यूट झाल्याने पाण्याचे गुणधर्म बदलल्याचं बोलल्या जात आहे. सरोवरातील पाणी हे खारट व अल्कधर्मी असल्याने याची पी एच नेहमी साडेदहा ते बाराच्या दरम्यान नोंदवली गेली आहे मात्र यंदा या पाण्याचा खारटपणा कमी होऊन याची पीएच आठ ते नऊ च्या दरम्यान कमी झाली आहे. त्यामुळे या सरोवरातील पाण्यात सजीव सृष्टी निर्माण होऊन भविष्यात लोणार सरोवराच अस्तित्वच धोक्यात येईल व जी सजीव सृष्टी निर्माण होत आहे ही कदाचित पर्यावरण व मानव जातीला धोकादायक ठरू शकते असं तज्ञांचे मत आहे.
काही स्थानिक व सरोवर अभ्यासकांनी यात पहिल्यांदाच मासे बघितल्याचं म्हटलं आहे. इतिहासात या पाण्यात कधीही मासे किंवा कुठलाही जीव जंतू त्यांनी बघितला नाही व तो जगू शकत नाही असा दावाही सरोवर अभ्यासकांनी केला आहे. त्यामुळे "एबीपी माझा" ने थेट लोणार सरोवराच्या तळाशी जाऊन पाहणी केली असता यात मोठ्या प्रमाणात मासे आढळून आलेत तर "एबीपी माझा"ने या पाण्याची पीएच तपासली असता ती आठ ते नऊच्या दरम्यान आढळली.
पाण्याचे गुणधर्म तपासतानाचा डेमो- (Maharashtra Lonar Lake)
लोणार सरोवराला लाखो वर्षांचा इतिहास आहे. बेसॉल्ट खडकात उल्कापातामुळे पडलेले हे जगातील एकमेव सरोवर असल्याने जगभरातील पर्यटक हे सरोवर पाहण्यासाठी लोणार येथे येत असतात. या सरोवरातील पाणी खारट आणि अल्क धर्मी असल्याने यात कधीही कुठलाही सजीव आढळला नाही मात्र आता मासे आढळत असल्याने जगभरात या सरोवराची पुन्हा चर्चा व्हायला लागली आहे. लाखो वर्षांचा बदलता इतिहास सध्या आपण बघत असून लोणार सरोवरातील मासे भविष्याकाळात एनाकोंडा किंवा डायनासोर ही होऊ शकतात असं स्थानिकांचं मत आहे यामुळे पर्यावरणासह मानव जातीलाही धोका निर्माण होऊ शकतो असं तज्ञांचे मत आहे आणि यामुळे या सरोवाराला युनेस्कोने दिलेला रामसर दर्जा धोक्यात येऊ शकतो त्यामुळे संबंधित प्रशासन, जागतिक स्तरावरील पर्यावरण वाद्यांनी या बदलत्या लोणार सरोवराकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झालेली आहे.