Mahua Moitra Kaali Poster Controversy : सध्या काली या डॉक्युमेंट्रीमुळे चित्रपट दिग्दर्शक लीना मणिकेलाई (Leena Manimekalai) या चर्चेत आहे. या डॉक्युमेंट्रीचं पोस्टर काही दिवसांपूर्वी लीना मणिमेकलई यांनी सोशल मीडियावर शेअर केलं होतं. त्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरबाबत तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी वक्तव्य केलं होतं. महुआ मोईत्रा यांनी एक ट्वीट देखील शेअर केलं होतं. त्या ट्वीटमध्ये त्यांनी लिहिलं होतं, 'मला अशा भारतात राहायचे नाही जिथे हिंदू धर्माबद्दल भाजपचा पितृसत्ताक ब्राह्मणवादी दृष्टीकोन प्रचलित असेल आणि बाकीचे लोक धर्माभोवती घुटमळतील.  मी मरेपर्यंत या विषयी लढा देईल. तुम्ही गुन्हा दाखल करा. मी कोणत्याही न्यायालयात लढा द्यायला तयार आहे.'  महुआ मोईत्रा यांच्या या ट्वीटला रिप्लाय देत प्रसिद्ध अभिनेते प्रकाश राज (Prakash Raj) यांनी समर्थन केलं आहे. 


प्रकाश राज यांचे ट्वीट 
प्रकाश राज यांनी एक ट्वीट शेअर करुन महुआ मोईत्रा यांचे समर्थन केलं आहे. 'रॉकस्टार महुआ मोईत्रा मी तुमचे समर्थन करतो. जे लोक लोग भारतीय जनता पार्टीच्या मूर्खपणाला कंटाळले असतील ते आमच्यासोबत येऊ शकतात.' प्रकाश राज यांनी या ट्वीटमध्ये जस्ट आस्किंग या हॅशटॅगचा वापर केला आहे. प्रकाश राज यांच्या या पोस्टला अनेकांनी रिअॅक्शन्स दिल्या आहेत.  






प्रकाश राज यांच्या ट्वीटवर नेटकऱ्यांच्या रिअॅक्शन 
एका नेटकऱ्यानं प्रकाश राज यांच्या वक्तव्यावर रिअॅक्शन दिली. त्यानं ट्वीटमध्ये लिहिलं, 'दोन बाजूंनी खेळ खेळू नका. तुम्ही एकीकडे नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याचा विरोध करता. तर दुसरीकडे तुम्ही महुआ मोईत्रा यांना सपोर्ट करता.' दुसऱ्या नेटकऱ्यानं कमेंटमध्ये लिहिलं, 'महुआ मोईत्रा या धर्माच्या विरुद्ध बोलल्या आहेत.' 


हेही वाचा: