Prajakta Mali  : अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही तिच्या नवनवीन प्रोजेक्ट्समुळे कायमच चर्चेत असते. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वी तिचा कवितासंग्रह प्राजक्तराज प्रकाशित केला. त्यानंतर तिने तिच्या दागिन्यांचा ब्रँड प्राजक्तराज लॉन्च केला. त्यानंतर तिने कर्जत इथे तिचं आलिशान असं फार्महाऊस प्राजक्तकुंज घेतलं. या सगळ्यानंतर प्राजक्ताने पुन्हा एकदा तिचं स्वप्न पुर्ण केलं आहे. प्राजक्ताने तिच्या सोशल मीडियावरुन तिचे काही फोटो शेअर केलेत. यामध्ये ती काही कागदपत्रांवर सही करताना दिसत आहे. 


अभिनेत्री प्राजक्ता माळी ही झी मराठी वाहिनीवरील जुळून येती रेशीमगाठी या मालिकेतून घराघरात पोहचली. त्यानंतर तिने हंपी, लॉकडाऊन यांसारख्या सिनेमांमधून मोठ्या पडद्यावरही तिच्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर तिने रानबाजार या सीरिजमधून ओटीटी माध्यमांवरही पाऊल ठेवलं. सध्या ती महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा सांभाळत आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातूनही प्राजक्ता प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. त्यातच आता तिने तिच्या सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पण प्राजक्ताने तिचं कोणतं स्वप्न पूर्ण केलं आहे, याबाबत तिने अद्याप कोणताही खुलासा केला नाहीये. 


प्राजक्ताने सोशल मीडियावर केले फोटो शेअर


प्राजक्ताने तिच्या इन्स्टाग्रामवरुन काही फोटो शेअर केलेत. यामध्ये की काही कागदपत्रांवर सही करत असून तिची आई देखील तिच्या शेजारी असल्याचं पाहायला मिळतंय. या फोटोंना प्राजक्ताने दिलेल्या कॅप्शने विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. यावर प्राजक्ताने कॅप्शन दिलंय की, 27 एप्रिल 2024 मधील आतापर्यंतच्या बहुप्रतिक्षित कागदपत्रांवर सही केली आहे. ही विवाहनोंदणी नाही. त्यामुळे प्राजक्ताने तिच्या लग्नाच्या चर्चांना पूर्णविरामही दिला. 


प्राजक्ताच्या पोस्टवर नेटकऱ्यांच्या कमेंट्स दरम्यान प्राजक्ताच्या या पोस्टवर अनेक कमेंट्स आल्या आहेत. अनेकांनी प्राजक्ताचं अभिनंदन देखील केल्याचं पाहायला मिळतंय. तसेच काहींनी मजेशीर कमेंट्स केल्याचंही चित्र आहे.फरसाणची मोठी ऑर्डर मिळाली वाटतं अशी कमेंट एका युजरने केली आहे.           






ही बातमी वाचा : 


कुणावर तरी प्रेम करणं माझं स्वप्न होतं..., 20 व्या वर्षी अब्दु रोजिक अडकणार लग्नबंधनात; 'या' दिवशी करणार नव्या आयुष्याची सुरुवात