Prajkta Mali : 'प्राजक्ता माळी' (Prajkta Mali) ही सातत्याने अनेक नवीन प्रयोग करत आहे. तिने 'प्राजक्तराज' या तिच्या काव्यसंग्रहानंतर, दागिन्यांचा ब्रँड देखील सुरु केला. तसेच आता प्राजक्ता निर्मिती क्षेत्रातही पदार्पण करणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच आता मोठ्या काळानंतर प्राजक्ता माळी पुन्हा एकद्या मोठ्या पडद्यावर झळकरणार आहे. या चित्रपटात प्राजक्ता मुख्य भूमिकेत दिसरणार आहे.'भिशी मित्र मंडळ' (Bhishi Mitra Mandal) असं तिच्या आगाम चित्रपटाचं नावं आहे. मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत प्राजक्ता माळीचे नाव आघाडीवर आहे. आजवर अनेक चित्रपट तसेच मालिकांमधून तिने आपल्या अभिनयाची मोहोर रसिक प्रेक्षकांच्या मनात उमटवली आहे.
आता प्राजक्ता एका नव्या सिनेमातून प्रेक्षकांना भेटण्यास सज्ज झालीये. नुकतच या चित्रपटाचा मुहूर्त पुण्यात पार पडला. यावेळी चित्रपटाचे निर्माते, प्रस्तुतकर्ते, लेखक, दिग्दर्शक आणि तांत्रिक टीम उपस्थित होती. अमोल कागणे आणि शरद पाटील हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. किरण कुमावत, लक्ष्मण कागणे, विनया मोरे, अजिंक्य जाधव, अक्षय बोडके आणि गौरी पाठक यांनी या चित्रपटाच्या निर्मितीची धुरा संभाळली आहे.
लवकरच पुण्यात होणार चित्रीकरणाला सुरुवात
सागर पाठक यांनी या चित्रपटाचे लेखन केले आहे तसेच सुमित संघमित्र हे या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहेत. या चित्रपटाच्या शुटींगला लवकरच पुण्यात सुरु होणार आहेत. असून संजीवकुमर चंद्रकांत हिल्ली हे या सिनेमाच्या सिनेमाटोग्राफर म्हणून काम पाहणार आहेत. भिशी मित्र मंडळ या चित्रपटामध्ये प्राजक्तासोबत कोणते कलाकार दिसणार यासाठी प्रेक्षकांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.
अशी असेल 'भिशी मित्र मंडळ'ची गोष्ट
भिशी म्हणजे, ग्रुपमधील सदस्य प्रत्येक महिन्याला ठराविक पैसे एकत्र करून ते टप्प्याटप्प्याने सर्वांना वापरण्यासाठी दिले जातात. साधारणत: प्रत्येक महिन्याला ग्रुपमधील एका सदस्याच्या घरी किंवा त्यांनी ठरवलेल्या एका ठिकाणी जमून, पैसे गोळा करून ते एक सदस्याला दिले जातात. भिशी हा प्रकार विशेषत: महिला, कामगार आणि व्यापाऱ्यांमध्ये अधिक प्रचलित आहे. याच भिशीवर आधारित ही गोष्ट आहे. त्यामुळे धमाल, कॉमेडी आणि निखळ मनोरंजक कथानक असलेला हा चित्रपट प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरेल.
ही बातमी वाचा :
Aashram 4 : जपनाम जपनाम, बाबा निराला परत येणार! 'आश्रम 4' च्या रिलीज डेटबाबत मोठी अपडेट