Prachi Pisat On Sudesh Mhashilkar: अभिनेत्री प्राची पिसाटनं (Prachi Pisat) फेसबुक चॅटचा स्क्रिनशॉर्ट शेअर केला आणि संपूर्ण मराठी इंडस्ट्री हादरली. प्राचीला फेसबुक चॅटवर दिग्गज अभिनेते सुदेश म्हशीलकर (Sudesh Mhashilkar) यांच्या अकाउंटवरुन काही आक्षेपार्ह्य मेसेज आले होते. प्राचीनं शेअर केलेल्या स्क्रिनशॉर्ट्समध्ये 'हल्ली खूप सेक्सी दिसायला लागलीयस...', 'तुझा नंबर पाठव ना... तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीय...', असे मेसेज होते. त्यानंतर प्राचीनं म्हटलं होतं की, मला कोणावरही कसलाही आरोप करायचा नाही. माझं एवढंच म्हणणं आहे की, त्यांनी माझी माफी मागावी आणि विषय संपवावा. पण, सुदेश म्हशीलकरांकडून या प्रकरणावर कसलीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.
अखेर पाच दिवसांनी सुदेश म्हशीलकरांनी या प्रकरणावर मौन सोडलं आणि लांबलचक पोस्ट फेसबुकवर लिहिली. तसेच, त्यासोबत त्यांनी भाईंदर पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीचा आणि प्राचीच्या फेसबुक चॅटचा फोटो शेअर केला होता. अशातच, आता या प्रकरणाला पूर्णविराम मिळेल असं वाटलं होतं. पण, प्राची पिसाटनं पुन्हा एकदा स्क्रिनशॉर्ट शेअर करुन प्रश्न उपस्थित केले आहेत.
प्राची पिसाटनं पोस्टमध्ये काय म्हटलंय?
सुदेश म्हशीलकरांनी लांबलचक पोस्ट शेअर केल्यानंतर प्राची पिसाटनंही आणखी एक स्क्रिनशॉर्ट शेअर करुन काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच, अजूनही वेळ गेलेली नाही माफी मागा आणि विषय संपवा, असं ठणकावून सांगितलं आहे. प्राची पिसाट म्हणालीय की, "मुद्दा काय तुम्ही बोलता काय? नक्की माझा नंबर सेव्ह होता की नव्हता? हॅक झाल्यानंतरही फेसबुक अकाऊंट्सचा अॅक्सेस होता, तर गप्प का बसलात? अकाऊंट हॅक झालंय हे माहिती असतानाच, फेसबुकवर लगेच किंवा या पाच दिवसांत पोस्ट का शेअर केली नाही. चॅटमध्येच खाली लगेच मसेज का नाही केला की, अकाऊंट हॅक झाला आहे असं."
"राहिला प्रश्न हसणाऱ्या इमोजीचा तर 50-60 वर्षांच्या माणसाचा अपमान करण्याऐवजी प्रत्येक मुलगी असाच रिप्लाय करून दुर्लक्ष करते आणि विषय संपवते. दुसऱ्यांदा पण दुर्लक्ष करते, मी पण तेच केलं. तुम्ही अजूनही माफी मागू शकता आणि हा विषय संपवा...", असं प्राची पिसाट म्हणाली आहे.
दरम्यान, प्राचीनं सुदेश म्हशीलकरांच्या चॅटचे फोटो शेअर केल्यानंतर मराठी सिनेसृष्टीत खळबळ माजली होती. त्यानंतर अनेक कलाकारांनी सुदेश म्हशीलकरांची बाजू घेतली होती. तर, अनेकांनी प्राचीची बाजू घेत, तिला योग्य केल्याचं सांगितलं होतं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :