Baahubali 3 : साऊथ सुपरस्टार प्रभास (Prabhas) सध्या त्याच्या आगामी ‘राधे श्याम’ (Radhe Shyam) या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. दिग्दर्शक राधा कृष्ण कुमार यांच्या ‘राधे श्याम’ या चित्रपटातून प्रभास आणि पूजा हेगडे ही जोडी 11 मार्च रोजी रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. ‘बाहुबली’ (Baahubali 3) स्टार प्रभासच्या प्रत्येक चित्रपटाबद्दल प्रेक्षक उत्सुक असतात. यावेळीही काहीसे असेच वातावरण दिसत आहे.


सध्या सुपरस्टार प्रभास या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यादरम्यान या चित्रपटाच्या कलाकारांनी माध्यमांना मुलाखती दिल्या आहेत. यातील एका मुलाखतीदरम्यान, प्रभासने संकेत दिलेयत की, तो ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एसएस राजामौलींसोबत पुन्हा एकदा हातमिळवणी करणार आहे. प्रभास म्हणाला की, ‘राजामौली बाहुबली फ्रँचायझी बंद करणार नाहीत, त्यांची तशी अजिबात इच्छा नाहीये. त्यामुळे या सिरीजमधला पुढचा चित्रपट नक्कीच येऊ शकतो.


चाहत्यांमध्ये उत्सुकता!


प्रभासच्या या संकेतानंतर आता चाहत्यांमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे. ‘बाहुबली’च्या या ब्लॉकबस्टर टीमला पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर पाहण्यासाठी सगळेच आतुर झाले आहेत. बाहुबलीच्या दोन सुपरहिट फ्रँचायझींनंतर अनेकवेळा तिच्या तिसऱ्या पर्वाची चर्चा झाली. मात्र, या अधिकृत खुलासा कधीच झाला नाही. यानंतर अभिनेता प्रभास देखील त्याच्या पुढील चित्रपटांमध्ये व्यस्त झाला आणि दिग्दर्शक एसएस राजामौली त्यांच्या ‘आरआरआर’ चित्रपटात व्यस्त झाले.


मात्र, आता ‘बाहुबली 3’ संदर्भात स्वतः प्रभासने संकेत दिले आहेत. बाहुबली स्टार प्रभास आणि दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या ‘बाहुबली’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागावर काम सुरू असल्याची चर्चा आहे. म्हणजेच ‘बाहुबली 3’मधून लवकरच दिग्दर्शक राजामौली आणि प्रभास पुन्हा एकत्र येऊ शकतात. मात्र, हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला यायला बराच काळ लागू शकतो. कारण प्रभास सध्या त्याच्या आगामी 3 चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यस्त आहे. तर, राजामौलीदेखील त्यांच्या आगामी चित्रपटांची तयारी करत आहेत.


हेही वाचा :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha