Shakira Tax Case : पॉप सिंगर शकीरानं (Shakira) तिच्या 'वाका वाका' गाण्यातून प्रेक्षकांची विशेष पसंती मिळवली. पण शकीरावर आता टॅक्स चोरीचा आरोप करण्यात आला आहे. तिच्यावर करण्यात आलेल्या या आरोपामुळे तिला आठ वर्षाची शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते. शुक्रवारी (29 जुलै) स्पेनच्या एका सरकारी वकीलानं शकीराला आठ वर्षाची शिक्षा सुनावण्याची मागणी केली आहे. या सरकारी वकीलानं शकीरावर टॅक्स चोरीचा आरोप लावला आहे. शकीरानं टॅक्स चोरीची याचिका फेटाळून लावली होती. 24 मिनियन यूरो (2.4 कोटी) फाइन शकीरानं भरावा, अशी देखील मागणी या सरकारी वकीलानं केली आहे. जाणून घेऊयात हे संपूर्ण प्रकरण... 


शकीरावर 2012 ते 2014 मध्ये केलेल्या कमाईचा कर न भरल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा टॅक्स जवळपास 14.5 मिलियन यूरो आहे. शकीराच्या वकिलाने बुधवारी एक निवेदन जारी केले. या निवेदनात सांगण्यात आलं आहे की, शकीराला तिच्या निर्दोषतेबद्दल पूर्ण खात्री आहे आणि म्हणूनच तिने हे प्रकरण न्यायालयात जाऊ दिले. शकीराला खात्री आहे की ती निर्दोष असल्याचं सिद्ध होईल.


न्यायालयाने अद्याप खटल्याची तारीख जाहीर केलेली नाही. शकीराच्या वकिलाचे म्हणणे आहे की, शकीरा ही जागतीक स्तरावरील स्टार आहे. त्यामुळे जोपर्यंत खटला सुरू होणार नाही. तोपर्यंत एक एग्रीमेंट होण्याची शक्यता आहे. 


2010च्या फिफा विश्वचषकाचे अधिकृत गाणे ‘वाका-वाका’  मुळे शकीराला विशेष लोकप्रियता मिळाली. या गाण्यामुळे शकीराला जगभरातील प्रेक्षकांची पसंती मिळाली, या गाण्यात फुटबॉलपटू जेरार्ड पिकही दिसला होता. शकीरा जेरार्डपेक्षा 10 वर्षांनी मोठी आहे. शकीराचा जन्म 1977 मध्ये कोलंबियामध्ये झाला होता, तर जेरार्ड पिकचा जन्म 1987 मध्ये बार्सिलोना, स्पेनमध्ये झाला होता. शकीरा आणि जेरार्ड यांना दोन मुले आहेत. मात्र, या दोघांनी अद्याप विवाह केलेला नाही. शकीराने 2013 मध्ये पहिल्या मुलाला जन्म दिला. दोन वर्षांनंतर 2015 साली त्यांना दुसरा मुलगा झाला. फोर्ब्सच्या जगातील सर्वात ‘पॉवरफुल कपल’ यादीत शकीरा आणि जेरार्कचे नाव सामील होते.  पण काही दिवसांपूर्वी प्रेमात फसवणूक झाल्याचं कळताच शकीराने जेरार्कसोबतचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला.


हेही वाचा: 


Shakira : अखेर ‘वाका वाका गर्ल’ शकीराने मोडलं 12 वर्षांचं नातं! अधिकृतरीत्या केलं जाहीर