Britney Spears : पॉप सिंगर ब्रिटनी स्पीयर्स (Britney Spears) तिच्या वडिलांसोबत सुरू असलेल्या गार्डियनशिप प्रकरणामुळे बराच काळ चर्चेत होती. पॉप सिंगर नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत राहिली आहे. आता तिने तिच्या मातृत्वाची घोषणा केली आहे, ज्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. ब्रिटनी स्पीयर्सने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ब्रिटनीने सांगितले की, ती लवकरच आई होणार आहे. ही आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसोबत शेअर करताना ब्रिटनीने सोशल मीडियावर एक लांबलचक नोटही शेअर केली आहे.



या पोस्टमध्ये, ब्रिटनीने सांगितले आहे की, ती तिचा जोडीदार सॅम असगरीसोबत त्यांच्या पहिल्या पहिल्या बाळच्या आगमनाची वात पाहत आहे. जेव्हा, ती पार्टनर सॅम असगरीसोबत हवाई व्हेकेशनवर गेली होती, तेव्हा तिचे वजन वाढू लागले होते, हे पाहून तिच्या मनात प्रेगनन्सी चाचणीचा विचार आला. आपल्या पोस्टमध्ये ब्रिटनीने आपल्या मुलाची अपेक्षा असल्याचेही सांगितले आहे. स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी ब्रिटनी सध्या योगाचा आधार घेत आहे.


तिच्या पोस्टमध्ये ब्रिटनीने असेही लिहिले की, माऊ ट्रिपला जाण्यापूर्वी तिने खूप वजन कमी केले होते, मात्र पुन्हा अचानक तिचे वजन वाढले. मग, ब्रिटनीला प्रश्न पडला की, अचानक काय झाले असावे? ब्रिटनी तिच्या पोस्टमध्ये पुढे लिहिते की, तेव्हा तिच्या पतीने सांगितले की तू प्रेग्नंट आहेस. त्यानंतर ब्रिटनीची प्रेग्नन्सी टेस्ट झाली आणि तिला कळले की, ती आई होणार आहे. ब्रिटनी आणि तिचा जोडीदार सॅम असगरी यांचे हे पहिले अपत्य असल्याची माहिती आहे. पण, ब्रिटनीचे हे तिसरे अपत्य असेल. कारण, तिला माजी पती केविन फेडरलाइनपासून आधी दोन मुले आहेत.


हेही वाचा :