Pooja Sawant and Siddhesh Chavan Wedding : मागील काही महिन्यांपासून मराठी सिनेसृष्टीत अभिनेत्रींची लगीनसराई पाहायला मिळतेय. गौतमी देशपांडे (Gautami Deshpande), स्वानंदी टीकेकर (Swanandi Titkekar), शिवनी सुर्वे (Shivani Surve), तितिक्षा तावडे (Titeeksha Tawde), पूजा सावंत (Pooja Sawant) यांचे लग्नसोहळे धुमधडक्यात पार पडले. या अभिनेत्रींनी त्यांच्या लग्नातील स्पेशल क्षण त्यांच्या सोशल मीडियावरुन शेअरही केले. नुकतच अभिनेत्री पूजा सावंत हिने तिच्या लग्नातील अनसीन क्षणांचा एक व्हिडिओ शेअर केलाय.
महिन्याभरापूर्वी अभिनेत्री पूजा सावंत हिने सिद्धेश सावंतसोबत लग्नगाठ बांधली. पूजाच्या लग्नात तिच्या कलाकार मित्रमंडळींनी देखील हजेरी लावली होती. तसेच त्यांचे धम्माल व्हिडिओ देखील समोर आले होते. पूजाच्या मेहंदी, हळद, संगीत आणि लग्नसोहळ्याचे फोटो तिच्या सोशल मीडियाच्या अकाऊंवरुन तिने चाहत्यांसोबत शेअर केले होते. त्यावर अनेकांनी कमेंट्स करत तिला तिच्या नव्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
पूजाने शेअर केला तिच्या लग्नातील व्हिडिओ
पूजा सावंतने तिच्या लग्नातील अनसीन क्षण शेअर केले आहेत. पूजा सावंतचा दगडी चाळ हा चित्रपट तुफान गाजला. त्याचप्रमाणे त्या चित्रपटातील गाणी देखील तितकीच पसंतीस उतरली. त्यामधील मन धागा धागा जोडते नवा हे गाण या व्हिडिओला लावण्यात आलं आहे. पूजाच्या या व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडिओला पूजाने सुंदर असं कॅप्शन दिलं आहे. पूजाने म्हटलं की, असे वाटते की मी काल रात्री पाहिलेल्या सर्वात सुंदर स्वप्नातून उठले आहे. या सुंदर क्षणाला महिना झाला आहे, यावर माझा अजिबात विश्वास बसत नाहीये.
पूजा-सिद्धेशच्या लग्नात सेलिब्रिटींची हजेरी
पूजा-सावंतच्या शाही विवाहसोहळ्याकडे सर्वांचच लक्ष लागलं होतं. त्यानंतर कलाविश्वासह चाहत्यांकडून तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव झाला. पूजा-सिद्धेशच्या लग्नात अभिजीत व सुखदा खांडकेकर, प्रार्थना बेहेरे व तिचा पती अभिषेक जावकर, भूषण प्रधान, वैभव तत्त्ववादी, मृण्मयी देशपांडे, सिद्धार्थ चांदेकरसह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.
पूजा सावंतचं नाव अभिनेता वैभव तत्तववादी (Vaibhav Tatwawadi) आणि भूषण प्रधान (Bhushan Pradhan) बरोबरही जोडलं गेलं होतं. पूजाने दगळी चाळ, क्षणभर विश्रांती, पोस्टर बॉइज, नीळकंठ मास्तर, भेटली तू पुन्हा, बोनस अशा अनेक गाजलेल्या सिनेमांत काम केलं आहे. तिचे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत. अभिनय आणि नृत्यासह आपल्या सौंदर्याने पूजाने सर्वांना वेड लावलं आहे. आता अभिनेत्रीच्या आगामी सिनेमांची चाहत्यांना उत्सुकता आहे.