Gangubai Kathiawadi : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आलिया भटचा  (Alia Bhatt)  बहुचर्चित चित्रपट गंगूबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) शुक्रवारी (25 फेब्रुवारी) प्रदर्शित झाला. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट पाहात होते. प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी गंगूबाई काठियावाडी या चित्रपटानं कोट्यवधींची कमाई केली. या चित्रपटातील आलियाच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आलियाची बहिण पूजा भटनं (Pooja Bhatt) देखील गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट पाहिला. एका मुलाखतीमध्ये पूजानं  या चित्रपटामधील आलियाच्या अभिनयाबद्दल सांगितलं. 


पूजानं मुलाखतीमध्ये सांगितलं की तिनं गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचा फर्स्ट डे फर्स्ट शो पाहिला. पुढे तिनं सांगितलं, 'मल्टिप्लेक्स चित्रपटगृहात लोक टाळ्या आणि शिट्या वाजवत नाहित, असं तुम्हाला वाटलं असेल पण असं नाहिये मी लोकांना ओरडताना, शिट्या वाजवताना पाहिलं आहे. प्रेक्षकांना हा चित्रपट खूप आवडला. संजय लीली भन्साळी यांच्या या चित्रपटामुळे आलिया एका वेगळ्या लेव्हलवर पोहचली आहे. आलिया आधी मुलगी होती. या चित्रपटानंतर आता ती महिला झाली आहे. या चित्रपटात तिनं खूप चांगलं काम केलं आहे.'






गंगूबाई काठियावाडी या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. चित्रपटात आलिया भट शांतनु, आलिया, अजय देवगणस विजय राज, सीमा पाहवा यांनी या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली.  


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha