Ketaki Chitale : बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेनं (Ketaki Chitale) राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली होती. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी केतकीवर गुन्हे दाखल करण्यात आल्यानंतर केतकीला अटक करण्यात आली. आता केतकी विरुद्धच्या खटल्याचा तपास पोलीस करत आहेत.  केतकीविरुद्धच्या खटल्याचा तपास करणाऱ्या अधिकाऱ्यांनी केस डायरीतून माहिती तंत्रज्ञान (आयटी) कायद्याचे कलम 66 अ काढून टाकले. 


काही वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केलेले कलम वापरण्याबाबत राष्ट्रीय महिला आयोगाने नुकतेच महाराष्ट्र पोलिसांना प्रश्न विचारला होता आणि उत्तर दाखल करण्यास सांगितले होते. त्यानंतर महाराष्ट्र पोलीस ठाणे पोलिसातील जबाबदार अधिकाऱ्याला जबाब विचारला. मात्र न्यायालयीन प्रक्रियेनुसार आता हे कलम हटवण्यात आल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या सूत्रांनी दिली. तथापि, हे स्पष्टपणे सूचित करते की, पोलीस अधिकाऱ्याने माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम 66 (A)जोडले हे कोणत्या राजकीय दबावाखाली जोडले गेले असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.


महाराष्ट्र पोलिसातील वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणात कळवा पोलीस स्टेशनमधील जबाबदार अधिकाऱ्याने केतकी चितळेविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्याचं कलम 66 (अ) का लावलं याचं उत्तर आणि अहवाल मागितला होता. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वीच रद्दबातल ठरवलेल्या कलमाचा गैरवापर झाल्यामुळे राष्ट्रीय महिला आयोगाने महाराष्ट्र पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर महाराष्ट्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही याबाबत अहवाल मागवला.  केतकी चितळे अटक प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना समन्स पाठवून उत्तर देण्यास सांगितलं होतं. समन्सनंतर महासंचालकांनी राष्ट्रीय महिला आयोगाला कारवाईचा अहवाल पाठवला. महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली या प्रकरणी दिल्लीत  17 जून रोजी सुनावणी झाली होती.


अंबाजोगाई, कळवा पोलिस ठाण्यात देखील केतकीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तसेच  कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत कळवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नाशिक, पवई, पुणे, आमरावती, पिंपरी चिंडवड आणि गोरेगाव येथे देखील केतकी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


हेही वाचा :


Ketaki Chitale : सुप्रीम कोर्टाने रद्द केलेलं कलम का लावलं?, महाराष्ट्रातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने कळवा पोलिसांकडे उत्तर मागितलं