नवी दिल्ली : दोन दिवसांपूर्वी 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला 70 वा वाढदिवस साजरा केला. या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांच्यावर सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव झाला. अनेकांनी सोशल मीडियावर पंतप्रधान मोदी यांना शुभेच्छा दिल्या. यात बॉलिवूड सेलिब्रिटींचा देखील मोठ्या प्रमाणात सहभाग होता. यातील काही लोकांना मोदींनी आपल्या अकाऊंटवरुन रिप्लाय देखील केला आहे. यात अभिनेता अजय देवगणचा समावेश आहे.

Continues below advertisement

गलवान खोऱ्यातील शहीद जवानांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर, अजय देवगण चित्रपट बनवणार

अजय देवगणने आपल्या ट्वीटरवरुन मोदी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावर उत्तर देताना पंतप्रधान मोदी यांनी आभार व्यक्त केले आहेत. सोबतच अजय देवगणचा मुलगा युगचं देखील कौतुक केलं आहे. मोदींनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, आपल्या शुभेच्छा मिळाल्या. युग आपल्या वाढदिनी पृथ्वीला हिरवंगार करण्यासाठी काम करत होता. ही जागरुकता कौतुकास्पद आहे, असं मोदींनी म्हटलं आहे.

Continues below advertisement

13 सप्टेंबर रोजी अजय देवगनचा मुलगा युगचा वाढदिवस होता. तो 10 वर्षांचा झाला आहे. अजय देवगननं सोशल मीडियावर युगचा एक फोटो शेअर केला होता. त्यात तो वृक्षारोपण करताना दिसत आहे. या फोटोसोबत एक संदेश देखील दिला होता. 'हे काम करण्यानं भविष्यात हिरवळ तयार होईल. यापेक्षा आणखी काही म्हणायचं नाही.' असं अजय देवगणनं म्हटलं होतं.