Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील राम मंदिराचे (Ram Mandir) आज (दि.22) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमाला महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan), रजनीकांतसह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांनी हजेरी लावली होती. रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर पीएम मोदींनी जोरदार भाषण केलं. भाषण झाल्यानंतर पीएम मोदींनी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांची भेट घेतली. पीएम मोदी मंदिर परिसरातून जात असताना ही भेट झाली. पीएम मोदी दोन्हीही दिग्गज नेत्यांशी बातचीत केली. 


पीएम मोदींचा महानायक बच्चन यांच्याशी संवाद 


राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी अमिताभ बच्चन मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनसह अयोध्येत दाखल झाले होते. अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यासह बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर पीएम मोदींनी अमिताभ बच्चन यांच्याशी संवाद साधला. फोटोंमधून दिसते की, पीएम मोदी अमिताभ बच्चन यांची हातवारे करत चौकशी करताना दिसत आहेत. तर दुसरीकड अमिताभ बच्चन पीएम मोदींचे अभिनंदन करताना दिसत आहेत. 


रजनीकांतचीही केली चौकशी 


अमिताभ बच्चन यांच्याशिवाय नरेंद्र मोदींनी अभिनेते रजनीकांत यांचीही चौकशी केली. अमिताभ बच्चन यांच्याबरोबरच रजनीकांत देखील अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहिले होते. उद्घाटन सोहळा संपन्न झाल्यानंतर पीएम मोदींनी रजनीकांत यांच्याशी देखील संवाद साधला. फोटोंमधून दिसते की, पीएम मोदी रजनीकांत यांची हातवारे करत चौकशी करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे रजनीकांत पीएम मोदींना अभिवादन करताना दिसतोय. प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी कुबेर टीला येथे गेले आहेत. 




बॉलिवूड सेलिब्रिंटीची राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती 


 आजच्या उद्घाटन सोहळ्यासाठी दाक्षिणात्य अभिनेतेही अयोध्येत दाखल झाले होते. राम चरण याच्याशिवाय चिरंजीवीही यांचीही राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थिती होती. याशिवाय बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटीही अयोध्येत दाखल झाले होते. त्यानी प्राणप्रतिष्ठेचा सोहळा अयोध्येत जाऊन पाहिला. अमिताभ बच्चन, रजनीकांत, रणबीर कपूर, आलिया भट्ट, कतरिना कैफ आयुष्मान खुराना, माधुरी दीक्षित, दक्षिणेचा देव म्हणून ओळखले जाणारे अभिनेते रजनीकांतही या सोहळ्यासाठी उपस्थित होते.