Jacqueline Fernandez Visits kashi: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस नुकतीच बाबा विश्वनाथांची नगरी काशी येथे पोहोचली. आपल्या आईच्या आत्म्यास शांती  मिळावी, यासाठी प्रार्थना तसेच अस्थींचे विसर्जन विधी पूर्ण करण्यासाठी तिनं उत्तर प्रदेश (वाराणसी) गाठले. जॅकलीनने सर्व विधींचे पालन करुन आपली आई किम फर्नांडिस यांच्या अस्थींचे पवित्र गंगेत विसर्जन केले.  मणिकर्णिका घाटावरील  या विधीदरम्यान जॅकलीन शांत आणि भावुक दिसत होती. या विधीदरम्यान तिच्यासोबत तिचे वडिलही उपस्थित होते.  

Continues below advertisement

जॅकलीन म्हणाली की, तिला सनातन धर्माच्या पंरपरा आणि अध्यात्म खूप आवडते.  याच कारणामुळे तिनं आपल्या आईच्या अस्थींचे विसर्जन करण्यासाठी काशीसारख्या पवित्र स्थळाची  निवड केली आहे.   जॅकलीनचा वाराणसी दौरा अत्यंत खासगी होता. याची माहिती कुणालाही देण्यात आली नव्हती. ती एका सामान्य भक्ताप्रमाणे घाटावर पोहोचली होती. 

माहितीनुसार,  ती या शहरात सुमारे दीड तास थांबली होती.   विशेष म्हणजे, तिने आपली ओळख लपवण्यासाठी आपला चेहरा  कापडाने झाकला होता.  जॅकलीनला कोणताही गाजावाजाशिवाय एका सामान्य भक्ताप्रमाणे पुजा करायची होती. ती थेट ताज हॉटेलमधून मणिकर्णिका घाटावर गेली होती.  तिथून तिनं वडिलांसोबत बोटीत बसून  गंगेच्या मध्यभागी गेली.  तिनं  काशी विश्वनाथ मंदिरासमोरच आपल्या आईच्या अस्थींचे विसर्जन केले.  

Continues below advertisement

वाराणसीचे आचार्य  विकास पांडे यांच्या देखरेखीखाली हे सर्व विधी पार पडले. यावेळी सर्व आवश्यक  विधी वैदिक मंत्रोच्चार आणि हिंदी रितीरिवाजानुसार  पूर्ण करण्यात आले आहे. पूजा संपन्न होताच जॅकलीनने वाराणसीहून मुंबई गाठले. 

गंभीर आजारावर उपचार घेत असताना जॅकलीनच्या आईचे निधन 

 

जॅकलीन फर्नांडीजच्या आईचे निधन 6 एप्रिल  2025 रोजी दीर्घ आजाराने निधन झाले होते. बरेच दिवस त्यांची प्रकृती खालावली होती.  2025 सालच्या मार्च महिन्यात  हार्ट स्ट्रोक आला होता.  यानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरु असतानाही  त्यांची प्रकृती गंभीर होत चालली होती. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते.  तब्बल 13 दिवस त्यांच्यावर उपचार सुरु होते.  13 दिवसांनंतर त्यांचे ह्रदयविकाराने निधन झाले. 

महत्त्वाच्या इतर बातम्या:

सलमान खानच्या वडिलांना मिळाला डिस्चार्च; 1 महिन्यांनंतर घरी परतले, कोणता झालेला आजार?