Divyanka Tripathi Vivek Dahiya pregnancy truth: प्रसिद्ध अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया हे टीव्ही जगतातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहेत. त्यांचा चाहतावर्गही खूप मोठा आहे. हे कपल प्रोफेशनल असो किंवा वैयक्तिक, प्रत्येक अपडेट सोशल मीडियातून चाहत्यांसोबत शेअर करतात. चाहते देखील त्यांच्या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करतात. सध्या अशी जोरदार चर्चा आहे की, हे जोडपं लवकरच आपल्या आयुष्यात नवीन अध्यायाला सुरुवात करतील. खरंतर मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे कपल लवकरच आई - बाबा होणार आहेत. दरम्यान, दोघांकडून अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
लग्नाच्या 10 वर्षांनंतर हे जोडपं आई - बाबा होणार
दिव्यांका त्रिपाठी आणि विवेक दहिया यांच्या लग्नाला 10 वर्ष पू्र्ण झाली आहेत. आता चर्चा अशी आहे की, या कपलला लवकरच एक नवीन जबाबदारी पार पाडावी लागणार आहे, कारण या जोडप्याच्या आयुष्यात एका नवीन पाहुण्याची एन्ट्री होणार असल्याची चर्चा आहे. ईटाइम्सच्या वृत्तानुसार, दिव्यांका आणि विवेकच्या जवळच्या सुत्रांनी सांगितलं की, दोन्ही परिवार सध्या खूप उत्सुक असून, त्यांच्या घरात नवीन सदस्याच्या आगमनाची तयारी सुरू आहे.
दिव्यांका आणि विवेकने आपले वैयक्तिक आयुष्य कायम प्रायव्हेट ठेवले आहे. जोडप्याच्या जवळच्या लोकांनी सांगितलं की, दोघेही आपले प्रेग्नेंसी फेज एन्जॉय करत आहेत. लवकरच 'बेबी शॉवर' अर्थात डोहाळे जेवण समारंभ होणार असल्याची माहिती आहे. या समारंभात या जोडप्याचे टीव्ही इंडस्ट्रीतील जवळचे मित्र आणि कुटुंब उपस्थित असतील. दरम्यान, दोघांनीही अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र, चाहत्यांमध्ये एक आनंदाचे वातावरण आहे.
दिव्यांका आणि विवेकची लव्ह स्टोरी कशी सुरु झाली?
अभिनेत्री दिव्यांका त्रिपाठी आणि विवेकची पहिली भेट 'ये है मोहब्बतें' या मालिकेच्या सेटवर झाली. दोघांमध्ये आधी मैत्री झाली. मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. 8 जुलै 2016 रोजी एका खासगी आणि मोजक्या लोकांच्या उपस्थित हा लग्न सोहळा पार पडला. या लग्न सोहळ्यात काही मोजके टीव्ही इंडस्ट्रीतील कलाकार आणि कुटुंब उपस्थित होते.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
गोऱ्या गोऱ्या गालांवरी चढली लाजंची लाली...; रश्मिका-विजयच्या हळदीचे PHOTOs
