All We Imagine as Light :  नुकत्याच पार पडलेल्या 'कान्स महोत्सवा'त आपली छाप सोडलेल्या 'ऑल वुई इमॅजिन ॲज लाइट' (All We Imagine As Light) या चित्रपटाची निवड ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी करण्यात आली आहे. मात्र, हा चित्रपट भारताचे प्रतिनिधीत्व करणार नाही. तर, फ्रान्स या देशाची अधिकृत प्रवेशिका म्हणून हा चित्रपट ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पायल कपाडिया यांनी केले असून मराठमोळी अभिनेत्री छाया कदम यांची या चित्रपटात महत्त्वाची भूमिका आहे. 


फ्रान्सच्या ऑस्कर समितीने एमिलिया पेरेझ, द काउंट ऑफ मॉन्टे क्रिस्टो आणि मिसेरिकॉर्डिया या चित्रपटांसह शॉर्टलिस्ट करण्यात आला होता. या चित्रपटात मुंबई राहणाऱ्या दोन परिचारिकांची गोष्ट आहे. या चित्रपटात कानी कुसरुती , दिव्या प्रभा , छाया कदम आणि हृधू हारून यांचा समावेश आहे. 


चित्रपटाची निर्मिती थॉमस हकीम आणि ज्युलियन ग्रॅफ यांनी त्यांच्या फ्रेंच-आधारित कंपनी पेटिट कॅओसद्वारे, भारतीय कंपन्यांच्या चॉक अँड चीज फिल्म्स अँड अनदर बर्थ, तसेच नेदरलँड्सच्या BALDR फिल्म, लक्झेंबर्गच्या लेस फिल्म्स फॉव्स, इटलीच्या सह-निर्मितीमध्ये केली 


कान्समध्ये चित्रपटाने सोडली छाप...






ऑल वी इमॅजिन एज लाइट या चित्रपटाने कान्समध्ये पाल्मे डी’ओर हा पुरस्कार मिळवला होता. अशी कामगिरी करणारा हा चित्रपट 30 वर्षातील पहिला भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने कान्स येथे ग्रँड प्रिक्स जिंकून भारताचा अभिमान वाढवला होता. हा महोत्सवाचा दुसरा सर्वोच्च सन्मान आहे. अभिनेता राणा दग्गुबती याची कंपनी स्पिरिट मीडियाच्या माध्यमातून नुकताच भारतात चित्रपट वितरणाचा करार केला.


पायलने FTII म्हणजेच 'फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया'(FTII) या प्रतिष्ठित संस्थेतून तिचं चित्रपट निर्मतीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. पण तिचा हा काळ FTIIच्या इतिहासात लक्षात राहणारा ठरला. तिच्या शैक्षणिक काळादरम्यान पायल आणि काही विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनामुळे FTII त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली. त्यावरुन पुणे पोलिसांत गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान पायलच्या कान्समधील यशानंतर तिच्यावरील हा खटला मागे घेण्याचं आवाहनही अनेकजणांनी केले होते.