Pavitra Punia Engaged With Mumbai Businessman: पवित्रा पुनिया (Pavitra Punia) पुन्हा प्रेमात पडलीय, पण यावेळी ती नात्यात बदलली आहे. 'बिग बॉस 14' स्टार, जी पूर्वी एजाज खानसोबतच्या ब्रेकअपमुळे चर्चेत आली होती, अखेर तिला आता तिचा सोलमेट सापडला आहे. अभिनेत्री पवित्रानं मुंबईतील एका व्यावसायिकाशी लग्न केलंय. अभिनेत्रीनं तिच्या भावी पतीसोबतच्या तिच्या लग्नाचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. यामध्ये मात्र, पवित्रा पुनियानं तिच्या जोडीदाराचा चेहरा दाखवलेला नाही.
पवित्रा पुनियाच्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल
एजाज खानशी ब्रेकअप झाल्यानंतर, पवित्रा पुनिया मुंबईतील एका व्यावसायिकाशी लग्न करणार आहे. या अभिनेत्रीनं तिच्या लव्ह लाईफमध्ये अनेक चढ-उतार अनुभवले आहेत आणि आता ती तिच्या आयुष्याला एक नवं वळण देत आहे. असं दिसतंय की, पवित्राला अखेर तिचा जीवनसाथी सापडला आहे. पवित्रा आता मुंबईतील एका व्यावसायिकाला डेट करतेय आणि दोघेही बऱ्याच काळापासून एकत्र वेळ घालवत आहेत. बऱ्याच काळापासून तिनं सर्वांपासून लपवून ठेवलेल्या नातं सर्वांसमोर आणलं आहे. पवित्रानं तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन साखरपुड्याचे फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती आणि तिचा पार्टनर बीचवर रोमँटिक होताना दिसत आहेत. पवित्रानं तिच्या पोस्टला कॅप्शन दिलंय. 'लॉक्ड इन। प्रेमानं हे ऑफिशियल केलंय... #पवित्रपुनिया लवकरच मिसेस ____#NS'
ब्रेकअपनंतर अभिनेत्रीला मिळालं खरं प्रेम
फोटोंमध्ये अभिनेत्री तिच्या भावी पतीसोबत रोमँटिक अंदाजात दिसतेय. ती नेहमीप्रमाणे रेड कलरच्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसतेय आणि तिच्या हातात मोठ्या हिऱ्याची अंगठी होती. याबाबत बोलताना पवित्रानं हिंदुस्थान टाईम्सला सांगितलं की, "हो, मला पुन्हा प्रेम मिळालंय..." 39 वर्षांची टेलिव्हिजन अभिनेत्री पुढे बोलताना म्हणाली की, "मी परदेशात जाईन कारण तो आणि त्याचे कुटुंब तिथे आहेत... मी माझ्या कुटुंबापासून दूर राहणार आहे याचे मला थोडे दुःख आहे, परंतु मी त्यांच्यासोबत वेळ घालवण्यास देखील उत्सुक आहे..."
पवित्रा पुनियाचा एक्स-बॉयफ्रेंड एजाज खान
पवित्रा पुनिया आणि एजाज खानची प्रेमकहाणी बिग बॉस 14 मध्ये सुरू झाली, जिथे त्यांची केमिस्ट्री, त्यांचे छोटे छोटे वाद आणि त्यांच्यातली इमोशनल गोष्टींची सर्वाधिक चर्चा झालेली. पण, काही कारणास्तव दोघांचं ब्रेकअप झालं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :