Paresh Rawal Reacts On Being Mocked For His Urine Drinking Statement: बॉलिवूडचा (Bollywood) कल्ट सिनेमा 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) गेल्या बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी अचानक दिग्गज अभिनेते परेश रावल (Actor Paresh Rawal) यांनी सिनेमातून अचानक माघार घेतली. त्यानंतर एकच गोंधळ उडाला. तेव्हापासून ते पुन्हा 'हेरा फेरी 3' करायला तयार होण्यापर्यंत या ना त्या कारणानं परेश रावल चर्चेत होते. पण आता पुन्हा एकदा परेश रावल चर्चेत आले आहेत, ते त्यांनी ट्रोलर्सना दिलेल्या सडेतोड उत्तरामुळे...
काही दिवसांपूर्वी परेश रावल यांनी एका मुलाखतीत बोलताना सांगितलेलं की, एकदा त्यांचा पाय फ्रॅक्चर झालेला, त्यावेळी तो पाय बरा करण्यासाठी ते स्वतःचीच लघवी प्यायचे. तेव्हा त्यांच्यावर फारच टीका झाली. नेटकऱ्यांनी परेश रावल यांच्यावर टीकेची झोड उठवली. तर काहींनी अनेक दाखले देत असं मूत्र पिणं धोकादायक असल्याचं सांगितलं. पण, आता या वादावर आणि त्यांना ट्रोल करणाऱ्या ट्रोलर्सवर प्रतिक्रिया दिली आहे.
बॉलिवूड अभिनेते परेश रावल यांनी 'बॉलीवुड हंगामा'ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना म्हटलं की, "मी त्यांना माझी लघवी तर नाही ना दिली? मग त्यांना त्याचाच प्रॉब्लेम असेल की, मी त्यांना लघवी नाही दिली? त्यांना असं वाटतंय की, 'अरे यांनी तर एकट्यानंच सगळी पिऊन टाकली, आम्हाला दिलीच नाही..."
लघवी पिण्याच्या वक्तव्यावर ट्रोलर्सना सडेतोड उत्तर
परेश रावल पुढे म्हणाले की, "ही माझ्या आयुष्यातील एक घटना आहे, जी 40 वर्षांपूर्वी घडली. मी ती सांगितली. त्यात मोठी गोष्ट काय आहे? लोकांना तीळापासून डोंगर बनवायला आवडते. त्यांना त्याचा आनंद घेऊ द्या..." परेश रावल यांनी दावा केला की, लघवी पिण्याच्या त्याच्या खुलाशानंतर अनेक लोकांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता, पण ते त्याबद्दल अधिक बोलू इच्छित नाही."
अक्षय कुमारबाबत काय म्हणाले परेश रावल?
परेश रावल यांनी अक्षय कुमारबद्दल दिलेल्या त्यांच्या वक्तव्यावरही भाष्य केलं. परेश रावल म्हणाले होते की, अक्षय त्याचा मित्र नाही तर फक्त एक सहकारी आहे. परेश रावल म्हणाले की, "मी फक्त म्हटलं आहे की, तो एक सहकारी आहे. जेव्हा तुम्ही 'मित्र' म्हणता तेव्हा त्याचा अर्थ ते लोक असतात, ज्यांना तुम्ही महिन्यातून 5-6 वेळा भेटता आणि आठवड्यातून अनेक वेळा बोलता."
अक्षय आणि मी घट्ट मित्र नाही : परेश रावल
परेश राव पुढे बोलताना म्हणाले की, "आणि तरीही, अक्षय कुमार किंवा मी दोघेही खूप घट्ट मित्र नाही. त्यामुळे कोणत्याही पार्टीत आमची भेट होणं शक्य नाही. म्हणूनच मी त्याला सहकारी म्हटलं. आणि यावरूनच चर्चांना उधाण आलं. लोक विचारतायत की, काय झालं? अरे बाबांनो, काहीही झालं नाही." दरम्यान, अक्षय कुमार आणि परेश रावल आता 'हेरा फेरी 3' मध्ये एकत्र दिसणार आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :