Akola Rain News : अकोल्यातल्या तेल्हारा तालुक्यात लेंडी नाल्याला आलेल्या पुरात वाहून गेल्याने एका 17 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. तेल्हारा तालुक्यातीलच पंचगव्हाण ते निंबोरा रस्त्यावरील ही घटना घडली आहे. रात्री उशिरा जंगली जनावरे हाकलण्यासाठी काका आणि पुतण्या मोटरसायकलने गेले होते. वाटतेच लेंढी नाल्याला पूर आलेला होता. या नाल्याचे पाणी पुलावरून वाहत होतो. दरम्यान, पुलावरील पाण्याचा अंदाज न आल्याने दुचाकी पाण्यात वाहून गेली. त्यासोबतच वैभव गवारगुरु हा देखील मुलगा नाल्याच्या पुरात वाहून गेलाय. परंतु त्याचे काका थोडक्यात बचावले आहेत. नाल्याच्या पुराच्या पाण्यातून रस्ता ओलांडत असताना ही घटना घडली. (Maharashtra Weather Update)
दरम्यान, वैभवचा मृतदेह हाती लागला असून या घटनेने गावात एकच खळबळ उडाली आहे. या नाल्याच्या पुरामुळे पंचगव्हाण निंभोरा हा रस्ता अनेक ठिकाणी खचला होता. अशातच हि घटना घडल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.
अकोल्यातील पारस परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस, गावाला अक्षरश: नदीचं रूप
दुसरीकडे, अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातल्या पारस परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला आहे. रात्री 3 ते सकाळी 7 वाजेपर्यंत सलग पाऊस झाला आहे. मुसळधार पावसामुळे पारस गावाला अक्षरश: नदीचं रूप आलं आहे. तर या पावसामुळे लोकांचे शेती आणि संसारोपयोगी साहित्य हि वाहून गेलं आहे. पारस आणि आजूबाजूच्या पाच- सहा गावात ढगफुटीसदृष्य पाऊस झाला आहे. मात्र, अकोला शहरासह जिल्ह्याच्या अनेक भागांत अद्याप पावसाचा थेंबही नसल्याचे पुढे आले आहे.
मन नदीच्या पुलावरून पाणी; शेगाव-आकोट राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प
अकोला आणि बुलढाणा जिल्ह्याला जोडणारा शेगाव-अकोट राज्य महामार्गावरील वाहतूक ठप्प पडली आहे. लोहारा येथील मन नदीवरील पुलावरून सकाळी नऊ वाजेपासून पाणी वाहत असल्याने शेगाव आकोट हा राज्य महामार्ग वाहतुकीसाठी बंद झालेला आहे. मागील आठ दिवसांपासून परिसरामध्ये पावसाने दडी मारली होती, दरम्यान काल रात्रीपासून या भागामध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने नदी नाले तुडुंब भरून वाहत आहे. या मन नदीला पूर आल्याने अनेक पुलावरून पाणी जात आहे. शेगाव लोहारा दरम्यान असलेल्या या नदीच्या पुलावरून पाणी जात असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झालेली आहे.
हे ही वाचा