Kalki Koechlin On Anurag Kashyap Divorce: अभिनेत्री कल्की कोचलीन (Kalki Koechlin) आणि दिग्दर्शक अनुराग कश्यप (Anurag Kashyap) यांच्या लग्नाची स्टोरी तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. दोघांनी 2011 मध्ये उटी इथं आपली लग्नगाठ बांधलेली आणि लग्नानंतर अवघ्या दोन वर्षातच 2013 मध्ये त्यांनी एकमेकांपासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. पुढे दोन वर्षांनी 2015 मध्ये त्यांच्या घटस्फोटावर कायदेशीर मोहोर लागली. पुढे दोघांनी आपापले वेगळे मार्ग निवडले. अशातच आता घटस्फोटाच्या तब्बल 10 वर्षांनी अभिनेत्रीनं अनुराग कश्यपसोबतच्या घटस्फोटाबाबत उघडपणे भाष्य केलंय. अभिनेत्रीनं सांगितलं की, अनुराग कश्यपपासून वेगळं होणं, तिच्यासाठी वाटतं तितकं सोपं नव्हतं. तो काळ तिच्यासाठी खूप अडचणींनी भरलेला होता.
कल्की कोचलीननं 'झूम'शी बोलताना अनुराग कश्यप आणि तिचं नातं, तसेच दोघांचा झालेला घटस्फोट... यावर उघडपणे भाष्य केलं. कल्की म्हणाली की, एक काळ असा होता की, तिला वाटायचं की, दोघांनी एकमेकांच्या आयुष्यापासून दूर राहावं. पण, त्यानंतर मात्र, अनुरागला दुसऱ्या कुणासोबत तरी पाहून खूप वाईट वाटायचं. कारण नंतर मला त्याची खूप आठवण यायची, असंही ती म्हणाली.
कल्की नेमकं काय म्हणाली?
कल्कीनं मुलाखतीत बोलताना सांगितलं की, घटस्फोटानंतर मूव्ह ऑन होण्यासाठी तिला काही वर्ष लागली. घटस्फोटानंतर आम्ही एकमेकांपासून अंतर ठेवून राहिलो. पण, आता आमच्यात सर्वकाही ठीक आहे. आम्ही वेळोवेळी एकमेकांना भेटतो, असंही कल्कीनं सांगितलं. दरम्यान, काही दिवसांपूर्वी दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या मुलीचा लग्नसोहळा पार पडला. तेव्हाही कल्की उपस्थित असल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, कल्कीनं अनुरागपासून वेगळं झाल्यानंतर 11 डिसेंबर 2024 रोजी शेन ग्रेगोइरशी लग्न केलं.
"मी 13 वर्षांची असताना माझ्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आणि तो माझ्यासाठी खूप वाईट अनुभव होता. ते एकमेकांशी खूप वाईट पद्धतीने वागायचे, तिरस्कार करायचे. याचा माझ्या आयुष्यावरही परिणाम झाला आणि कदाचित त्यामुळेच कदाचित माझा घटस्फोट झाला.", असं कल्कीनं सांगितलं.
"घटस्फोटानंतरची पहिली काही वर्ष आम्हा दोघांसाठी अजिबात सोपी नव्हती. पण, मग एका क्षणी आम्हाला वाटलं की आपण एकमेकांच्या आयुष्यापासून दूर राहावं अशी जाणीव झाली. हा निर्णय योग्य होता कारण त्याला इतर कोणत्याही महिलेसोबत पाहणं माझ्यासाठी कठीण होतं.", असंही कल्की म्हणाली.
दरम्यान, कल्की केकलानच्या आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर, ती इस्रायली संगीतकार गाय हर्शबर्गची पत्नी आहे. लग्नाआधीच फेब्रुवारी 2020 मध्ये दोघांनीही मुलगी सॅफोला जन्म दिला. दोघेही इस्रायलमधील एका पेट्रोल पंपावर भेटले. बराच वेळ बोलल्यानंतर त्यांचं नातं अधिक घट्ट झालं. आणि मग त्यांनी बाळाला जन्म देण्याचा विचार केला. कल्कीचा जन्म भारतात झाला असला तरी तू फ्रेंच वंशाची आहे. तिचं पहिलं नाव हिंदू आहे आणि आडनाव प्रोटेस्टंट आहे. तसेच, तिचा नवरा रशियन, पोलिश आणि इराणी आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :