Paresh Rawal Lawyer Issued Statement: बॉलिवूडचा (Bollywood) दिग्गज अभिनेते परेश रावल (Paresh Rawal) यांनी 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) मधून अचानक एग्झिट घेतली. तेव्हापासूनच यासंदर्भात अनेक वाद समोर आले. चित्रपट अचानक सोडल्यानंतर अक्षय कुमारनं (Akshay Kumar) त्यांना 25 कोटींची नोटीस धाडली. त्यानंतर परेश रावल यांनी चित्रपटाची सायनिंग अमाउंट व्याजासह परत केली. यासह अनेक मुद्दे समोर आले. अशातच आता परेश रावल यांच्या वकीलांनी त्यांची बाजूही सर्वांसमोर मांडली आहे. यामध्ये त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. तसेच, अभिनेत्यानं चित्रपटातून बाहेर पडण्यासाठी बरेच मुद्दे कारणीभूत असल्याचंही म्हटलं आहे.
रविवारी सकाळी ट्विटरवर ट्वीट करत परेश रावल यांनी म्हटलेलं की, अक्षय कुमारनं धाडलेल्या 25 कोटींच्या नोटिशीला त्यांच्या वकिलांनीही उत्तर दिलं आहे. परेश रावल यांनी ट्वीट केलेलं की, माझ्या वकीलांनी माझ्या योग्य पद्धतीनं फिल्म सोडण्यावर उत्तर पाठवलंय. आता सगळं काही स्पष्ट झालंय.
...म्हणून परेश रावल यांनी सोडला 'हेरा फेरी 3'
परेश रावल यांच्या वकिलांनी आपल्या वक्तव्यामध्ये म्हटलंय की, फिल्म साइन केल्यानंतर त्यांना फिल्मची स्क्रिप्ट, स्क्रीनप्ले आणि एक लांबलचक अॅग्रीमेंट ड्राफ्ट मिळाला नाही, जो त्यांच्या क्वॉलिटीसोबत काम सुरू करण्यासाठी खूपच गरजेचा होता. यासर्व गोष्टींच्या अभावामुळे आणि मूळ चित्रपटाचे निर्माते नाडियादवाला यांनी चित्रपटाच्या निर्मितीवर आक्षेप घेत नोटीस पाठवल्यानंतर, परेश रावल यांनी प्रकल्प सोडला आणि व्याजासह पैसे परत केले. त्यांनी 'टर्म शीट' (प्राथमिक करार) देखील रद्द केला आहे.
क्रिएटिव्ह मतभेद नाहीत
परेश रावल यांनी हेसुद्धा स्पष्ट केलंय की, त्यांचं फिल्म सोडण्याचं कारण दिग्दर्शक प्रियदर्शन यांच्यासोबतचे क्रिएटिव्ह मतभेद नाहीत. त्यांना त्यांच्याबाबत कोणतीही तक्रार नाही. त्यांनी म्हटलं की, प्रियदर्शन यांच्यासाठी त्यांच्या मनात सन्मान आहे. परेश रावल असंही म्हणाले की, त्यांनी 'हेरा फेरी 3'मधून बाहेर पडण्याचा घेतलेला निर्णय विचारपूर्वक घेतलेला आहे. कारण आता बाबू भैय्याचं कॅरेक्टर त्यांच्यातील कलेला आकर्षित करु शकत नाही.
परेश रावल यांनी 11 लाख रुपये परत केले
रविवारी परेश रावल यांच्या वकिलांनी दिलेल्या स्पष्टीकरणातून स्पष्ट झालं की, परेश रावल आता फिल्मसाठी कोणत्याही प्रकारे जबाबदार असणार नाहीत. त्यांनी घेतलेली सायनिंग अमाउंट 11 लाख रुपये, व्याजासकट परत केलेत.
टीम, शूटिंग आणि खर्चांचं नुकसान
अक्षय कुमारच्या टीमचं म्हणणं होतं की, परेश रावल यांच्या एग्झिटनंतर फिल्मची टीम, शुटिंग आणि खर्चांचं नुकसान झालं. याला उत्तर म्हणून परेश रावल यांचे वकील म्हणाले की, "सर्वात आधी त्यांनी पैसे परत केले, त्यानंतर एक नोटीस पाठवली, पण त्यांना माहीत होतं की, अजूनही स्क्रिप्ट रेडी नाही आणि ना ही फिल्मचं टायटल ठरलंय. अशातच नुकसान होण्याचा प्रश्नच उतर नाही. त्यामुळे आता अपेक्षा आहे की, आता ते सत्याचा स्विकार करतील आणि पुढे जातील."
महत्त्वाच्या इतर बातम्या :