Paresh Rawal New Tweet On Hera Pheri 3: 'हेरा फेरी 3' (Hera Pheri 3) हा चित्रपट सध्या सतत चर्चेत आहे. हा चित्रपट त्याच्या शुटिंग किंवा रिलीजमुळे चर्चेत नाही, तर त्याच्या वादामुळे लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. 'हेरा फेरी' आणि त्यानंतर 'हेरा फेरी 2' या दोन्ही चित्रपटांनी लोकांना खळखळून हसवलं. अशातच आता 'हेरा फेरी 3'ची घोषणा झाल्यामुळे चाहते भलतेच खूश होते. पण, तेवढ्यातच अचानक ज्येष्ठ अभिनेके परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' सोडण्याची घोषणा केली आणि खळबळ माजली. परेश रावल (Paresh Rawal) यांनी साकारलेली बाबू भैय्याची भूमिका म्हणजे, चित्रपटाचा प्राण, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. त्यानंतर अक्षय कुमारनं परेश रावल यांना 25 कोटींची लीगल नोटीस धाडली आणि वादाला तोंड फुटलं. अशातच, आता परेश रावल यांनी एक ट्वीट केलंय आणि त्यामुळे त्यांच्या आणि निर्मात्यांमध्ये सर्व काही ठीक नाही, हे स्पष्ट होत असल्याचं बोललं जातंय. 

परेश रावल यांनी ट्वीटमध्ये काय लिहिलंय? 

परेश रावल यांनी ट्वीट करत 'हेरा फेरी 3' सोडत असल्याची घोषणा केलेली. अशातच आता परेश रावल यांनी केलेल्या आणखी एका ट्वीटमुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे. परेश रावल यांनी ट्वीटमध्ये लिहिलंय की, "माझे वकील अमित नाईक यांनी योग्य टर्मिनेशन आणि एक्झिटबाबत योग्य उत्तर पाठवलंय. एकदा त्यांनी जर माझं उत्तर वाचलं तर, सर्व समस्या सुटतील." परेश रावल यांच्या ट्वीटवर अनेकजण प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरनं लिहिलंय की, 'हेरा फेरी 3 तुमच्याशिवाय होऊ शकत नाही.' तर, आणखी एका युजरनं लिहिलंय की, 'जो जातोय, त्याला कोणीही रोखू शकत नाही.' एका युजरनं लिहिलंय की, 'हे सर्व पीआर आहे.' तर, दुसऱ्या एका युजरनं लिहिलंय की, 'मला बाबू भैयाशिवाय चित्रपट पहायचा नाही.'

परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' ची साइनिंग अमाऊंट परत केली

दरम्यान, परेश रावल यांनी परेश रावल यांनी 'हेरा फेरी 3' ची सायनिंग अमाउंट परत केल्याचं सांगितलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, परेश रावल यांनी सायनिंग अमाऊंट म्हणून 11 लाख रुपये घेतले होते आणि फिल्म सोडल्यानंतर ही अमाउंट 15 टक्के व्याजासह परत केली आहे. तसेच, 'हेरा फेरी 3'साठी परेश रावल यांना 15 कोटी रुपये मिळणार होते. त्यापैकी 14.89 कोटी रुपये चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर एका महिन्यात मिळणार होते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Actress Casting Couch Experience: मोठी फिल्म देतो, कॉम्प्रोमाइज कर, माझ्यासोबत रात्र घालव; रोहित शेट्टीच्या EX गर्लफ्रेंडसोबत काय-काय घडलेलं?