Pankaj Tripathi Talk about Parents : अभिनेता पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) बॉलिवूडच्या दिग्गज अभिनेत्यांपैकी एक आहे. मिर्जापूर आणि गँग ऑफ वासेपूरमधून त्याने लाखो चाहत्यांची मने जिंकली. सध्या पंकज त्रिपाठी त्याच्या 'मैं अटल हूं' या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या दरम्यान पंकजने (Pankaj Tripathi) एक मुलाखत दिली आहे. त्याने या मुलाखतीतून एक मोठा खुलासा केलाय. 


पंकज त्रिपाठीला (Pankaj Tripathi) गेल्या वर्षात नॅशनल अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. मात्र, हा पुरस्कार स्वीकारण्यापूर्वीच त्याच्या आईचे निधन झाले होते. काही दिवसांपूर्वी पंकज त्रिपाठीने एका वृत्तसंस्थेला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याने आईबद्दल भाष्य केले. पंकज त्रिपाठी म्हणाला, आई गेल्यानंतर मन सुन्न झाले होते. माझ्यासाठी नॅशनल अवॉर्ड जिंकणे हे देखील एक स्वप्नवत होते. 


नॅशनल अवॉर्ड मिळाल्यानंतरचे अनुभव केले शेअर


पुढे बोलताना पंकज त्रिपाठी म्हणाला, नॅशनल अवॉर्ड जिंकणे, हे माझ्यासाठी स्वप्नवत होते. हे फार मोठे यश आहे. हे यश मिळवण्याची माझी इच्छा होती. मी जेव्हा नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये शिकत होतो. तेव्हा हा पुरस्कार आशीष विद्यार्थींना मिळाला होता. यानंतर मनोज वाजपेयीने पिंजरा या सिनेमासाठी हा अवार्ड जिंकला होता. तेव्हा मला वाटत होते की, हे किती मोठे यश आहे. तेव्हा पासून मलाही वाटू लागले की, हा अवार्ड जिंकायला हवा. 


पंकज त्रिपाठीच्या आई-वडिलांना तो काय करतो? याबाबत काहीही माहिती नव्हते. याबाबतचा खुलासाही त्याने केला आहे. आपल्या आई-वडिलांबाबत बोलताना म्हणाला, "माझी आई एकदा मुंबईत आली होती. ती माझ्यासोबत राहात होती. मात्र, ती रोज मला गावी परत येण्यासाठी दबाव टाकत होती. तिला साधेपणाने राहण्याची सवय होती. तिला हे देखील माहिती नव्हते की, मी पॉप्युलर अभिनेता झालो आहे."


वाजपेयी यांची भूमिका का स्वीकारली?


पंकज त्रिपाठी (Pankaj Tripathi) म्हणाला, अटल बिहारी वाजपेयी यांचे चरित्र विराट आहे. त्यांची भूमिका कशी निभावणार? यावर मी विचार केला होता. निर्माते म्हणाले तुम्ही ही भूमिका केली नाहीत तर आम्ही सिनेमाच बनवणार नाही. त्यानंतर मी काही पुस्तक घेऊन दिल्लीला गेलो. तिथे मी फुकरेसाठी शूटींग करणार होतो. माझ्याकडे दिल्ली विद्यापीठातील एक प्राध्यापक आणि पत्रकार आले होते. त्यांनी माझ्याकडील पुस्तक पाहिली आणि प्रतिक्रिया दिली की, तुम्हीच हे करु शकता. त्यानंतर मी सिनेमा करण्यासाठी पूर्णपणे तयार झालो, असा खुलासा पंकज त्रिपाठीने केला. 


सेन्सॉर बोर्डाकडून काय सांगण्यात आले? 


सेन्सॉर बोर्डाबाबत पंकज त्रिपाठीला (Pankaj Tripathi) प्रश्न विचारण्यात आला होता. यावर पंकज त्रिपाठी म्हणाला की, याबाबतचे सर्व काम दिग्दर्शक आणि निर्मात्यांनी पाहिले आहे. माझ्याकडून चांगल्या पद्धतीने भूमिका निभावण्यात यावी, यासाठी 100 टक्के प्रयत्न केले. आता त्याला प्रेक्षक कसा प्रतिसाद देतात? हे माझ्या हातात नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या 


Hrithik Roshan: अन् ऋतिक रोशनने पहिल्या बायकोला मिठी मारली; क्षण पाहताच लोक म्हणाले...