Pandya Store Actress Pallavi Rao Confirms Divorce With Husband Suraj Rao: मनोरंजनसृष्टीत सध्या घटस्फोटांचं (Divorce) सत्र सुरू आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी अभिनेत्री लता सबरवाल (Actress Lataa Saberwal) आणि संजीव सेठ (Sanjeev Seth)यांच्या घटस्फोटामुळं चाहते पुरते हादरले होते. अशातच आता आणखी एका अभिनेत्रीला संसार मोडला आहे. लग्नाच्या 22 वर्षांनी अभिनेत्रीनं पतीपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. इंडस्ट्रीतलं आणखी एक लग्न मोडल्यामुळे चाहत्यांना जोरदार धक्का बसला आहे. 

'पांड्या स्टोअर' (Pandya Store) आणि 'क्युंकी सास भी कभी बहू थी' (Kyunki Saas Bhi Kabhi Bahu Thi) यासारख्या अनेक टीव्ही मालिकांमधून (TV Series) गाजलेली प्रसिद्ध अभिनेत्री पल्लवी रावनं (Actress Pallavi Rao) जाहीर केलं आहे की, ती आणि तिचा पती, दिग्दर्शक सूरज राव (Diector Suraj Rao) यांचा घटस्फोट झाला आहे. तिनं सांगितलं की, दोघांनी लग्नाच्या 22 वर्षांनी शांततापूर्ण जीवनाच्या शोधात परस्पर संमतीनं वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्रीच्या विभक्त होण्याच्या बातमीनं चाहत्यांना धक्का बसला. पल्लवीनं सूरजपासून वेगळं झाल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यावर मात्र, सूरज रावनं मौन बाळगलं आहे. 

पल्लवी राव, सूरज राव यांच्या घटस्फोटाचं नेमकं कारण काय? 

ईटाईम्सशी झालेल्या संभाषणात, पल्लवी रावनं खुलासा केला की, गेल्या काही वर्षांपासून त्यांच्यात सुरू असलेल्या सुसंगततेच्या समस्यांमुळे ते वेगळं होत आहेत. तिनं हा एक 'कठीण निर्णय' असल्याचं म्हटलं आहे. कारण त्यांना दोन मुलं आहेत. 21 वर्षांची मुलगी आणि 18 वर्षांचा मुलगा. टेलिव्हिजन अभिनेत्री पुढे बोलताना म्हणाली की, "कधीकधी, परस्पर संमतीनं वेगळं होणं आणि शांततापूर्ण जीवन जगणं चांगलं असतं. मी सूरजचा आदर करते आणि नेहमीच त्याला शुभेच्छा देते." दरम्यान, पल्लवी आणि सूरज दोन आठवड्यांपूर्वी वेगळे झाले आणि तेव्हापासून दोघेही वेगवेगळे राहतात. 2003 मध्ये या जोडप्याचं लग्न झालेलं.     

पल्लवी-सूरजपूर्वी 'या' प्रसिद्ध जोडप्याचं मोडलेलं लग्न 

काही दिवसांपूर्वी 'ये रिश्ता क्या कहलाता है' फेम अभिनेत्री लता सबरवालनं 15 वर्षांच्या लग्नानंतर आपला पती, अभिनेता संजीव सेठपासून विभक्त होण्याची घोषणा केली होती. 21 जून रोजी आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर अभिनेत्रीनं लिहिलेलं की, "बराच काळ शांत राहिल्यानंतर मी घोषणा करतेय की, मी (लता सबरवाल) माझे पती (संजीव सेठ) यांच्यापासून विभक्त होत आहे. मला एक गोड मुलगा दिल्याबद्दल मी तिचे आभार मानते. मी तिच्या भविष्यासाठी शुभेच्छा देते. तिनं पुढे लिहिलं की, मी सर्वांना विनंती करते की, कृपया माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या शांतीचा सन्मान राखावा आणि याबाबत कोणतेही प्रश्न विचारु नका किंवा फोन करुन त्रासही देऊ नका... धन्यवाद..."

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Movie Nana Patekar: 'या' फिल्ममध्ये नाना पाटेकरांनी साकारलेली सायको पतीची भूमिका, पत्नीचा करायचा छळ, 4 कोटींच्या फिल्मनं कमावलेले 31 कोटी