Shivkumar Sharma : पंडित शिवकुमार शर्मा (Shivkumar Sharma) यांच्यावर मुंबई येथे  शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या राहुल आणि रोहित शर्मा या दोन मुलांनी त्यांना मुखाग्नी दिला. मुखाग्नी देण्यात आल्यानंतर मुंबई (Mumbai) पोलिसांच्या पथकाने तीन राऊंड फायर करत पंडित शिवकुमार शर्मा अखेरची मानवंदना दिली. यावेळी शिवकुमार शर्मा यांच्या कुटुंबातील सदस्य तसेच त्यांचे चाहते उपस्थित होते. 


काल (10 मे) शिवकुमार शर्मा यांनी वयाच्या 84व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. ह्रदय विकाराच्या झटक्यानं त्यांंचं निधन झालं. त्यांनी वयाच्या 13व्या वर्षापासून संतूर वादनास सुरुवात केली आणि आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. 1955मध्ये त्यांनी मुंबईत पहिला कार्यक्रम सादर केला होता.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाहिली श्रद्धांजली 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट शेअर करुन शिवकुमार शर्मा यांना श्रद्धांजली वाहिली आहे. 'पंडित शिवकुमार शर्मा यांच्या निधनाने आपले संगीत विश्वाचं मोठे नुकसान झालं आहे. त्यांनी संतूर वाद्याला जागतिक स्तरावर लोकप्रिय केले. त्यांचे संगीत येणाऱ्या पिढ्यांना प्रेरणा देईल. त्यांच्यासोबत झालेला संवाद मला अजूनही लक्षात आहे. ओम शांती.'


1956 साली त्यांनी व्ही. शांताराम यांच्या 'झनक झनक पायल बाजे' या गाण्याला संगीत दिलं होतं. 1967 साली त्यांनी प्रसिद्ध बासरीवादक हरिप्रसाद चौरसिया आणि ब्रिज भूषण काब्रा यांच्यासमवेत 'कॉल ऑफ द व्हॅली' ही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध केली होती जी अप्लावधीच प्रसिद्ध झाली. 


संतूर वादनावर अनेक अल्बम तयार केले!


पंडित शिवकुमार शर्मा यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत संतूर वादनावर अनेक अल्बम तयार केले. 'द ग्लोरी ऑफ स्ट्रिंग्स - संतूर', 'वर्षा - अ होमेज टू द रेन गॉड्स', 'हंड्रेड स्ट्रिंग्स ऑफ संतूर', 'द पायोनियर ऑफ संतूर’, 'संप्रदाय’, 'वायब्रंट म्युझिक फॉर रेकी', 'एसेन्शियल इव्हनिंग चांट', 'द लास्ट वर्ड इन संतूर' आणि ‘संगीत सरताज’ यासह अनेक प्रायोगिक अल्बम त्यांनी सादर केले. 


हेही वाचा :