Panchayat Season 4 : 'पंचायत सीझन 3' नंतर आता त्याचा चौथा सिझन (Panchayat Season 4 ) कधी येणार याची उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. दरम्यान या सिरिजचा फक्त एक नाही तर दोन सिझन येणार आहेत. पण सध्या या सिरिजच्या चौथ्या सिझनविषयी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. त्याचप्रमाणे आता या कथेला कोणतं नवं वळण मिळणार याचीही उत्सुकता प्रेक्षकांना लागून राहिली आहे. सिरिजच्या चौथ्या सीझनचं शुटींग याच वर्षी ऑक्टोबरपासून मध्य प्रदेशातील सीहोरमध्ये सुरू होणार असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे.
त्याचप्रमाणे पुढच्या सीझनमध्ये दोन नवी पात्रं ही फुलेराशी जोडली जाणार आहे. त्यामुळे निर्माते सध्या पावसाळा संपण्याची वाट पाहत असल्याचं सांगण्यात आलंय. त्याचे प्री-प्रॉडक्शन मुंबईत सुरू झाले आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चौथा सीझन हा निवडणुकीवर असणार आहे. चौथ्या सीझनमध्ये तीन ट्रॅक रन केले जातील. एक म्हणजे निवडणुकीवरचा गोंधळ, दुसरा सचिवाचे प्रेम आणि रोमान्स आणि नंतर सचिवजींच्या कॅट परीक्षेचा निकाल.
नवीन भूमिकाही जोडल्या जाणार
दरम्यान सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इतर सीझनप्रमाणे पुढच्या सीझनमध्येही काही नवीन भूमिका जोडल्या जाणार आहेत. या भूमिका नवीन प्रधान, बनारक आणि आमदार यांचीही असू शकतात. मागच्या सिझनमध्ये खासदाराच्या पात्राची विशेष चर्चा झाली. त्यामुळे या सिझनमध्ये तेही पात्र दिसू शकतं.
'स्वदेश' सिनेमासारखी कथा असणार?
दरम्यान पुढच्या सिझनमध्ये स्वदेश सिनेमासारखी कथा असणार असल्याचं म्हटलं जातंय. कारण स्वदेश या सिनेमात शाहरुख ज्याप्रमाणे त्या गावात स्थायिक झाला होता, त्याचप्रमाणे सचिवजीं देखील त्याच गावात स्थायिक होणार असा विचार सध्या निर्माते करत असल्याचं म्हटलं जातंय.
सीझन 4 कधी येणार?
पीटीआयशी बोलताना शोचे दिग्दर्शक दीपक कुमार मिश्रा म्हणाले, 'आम्ही सीझन चार लिहायला सुरुवात केली आहे. दोन सीझनमध्ये सहसा आम्हाला ब्रेक मिळत नाही. तिसरा सीझन संपला आहे आणि आम्ही तीन ते चार भाग (चार सीझनचे) लिहिले आहेत. पाचवा सिझनही येणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 'पंचायत सीझन 4' 2026 मध्ये रिलीज होण्याची शक्यता आहे.