Tik Tok Star Sana Yousuf Shot Dead: पाकिस्तानातील (Pakistan) इस्लामाबादमधून (Islamabad) एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोमवार, 2 जून रोजी रात्री इस्लामाबादच्या जी-13 सेक्टरमध्ये 17 वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएंसर आणि टिकटॉक स्टार सना युसूफची (Sana Yousuf) हत्या करण्यात आली. तिच्या राहत्या घरात घुसून गोळ्या घालून तिची हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं सर्वांनाच धक्का बसला असून पाकिस्तानात खळबळ माजली आहे. 

हल्लेखोर घरात पाहुणा म्हणून घुसला

पाकिस्तानी मीडिया रिपोर्टनुसार, सना हिच्यावर एका अज्ञात व्यक्तीनं अगदी जवळून गोळ्या झाडल्या. हल्लेखोर घरात पाहुणा म्हणून घुसला. त्यानंतर त्यानं टिकटॉक स्टार सना युसूफवर गोळ्या झाडून तिची हत्या केली आणि लगेचच घटनास्थळावरुन पसार झाला. घटना घडण्यापूर्वी काळी काळ आधी सना युसुफनं तिच्या घराबाहेर संशयित हल्लेखोरासोबत काही काळ चर्चा केली होती. 

पाकिस्तानी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित घरात घुसला, त्यानं अनेक गोळ्या झाडल्या आणि नंतर तो घटनास्थळावरून पळून गेला. सना हिला दोन गोळ्या लागल्या आणि तिचा जागीच मृत्यू झाला. नंतर तिचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (पीआयएमएस) इथे नेण्यात आला. अधिकाऱ्यांनी हत्येचा संपूर्ण तपास सुरू केला आहे, पण अद्याप कोणत्याही संशयितांची ओळख पटलेली नाही किंवा त्यांना अटक करण्यात आलेली नाही. पोलीस सदर घटनेचा तपास करत असून हल्लेखोर टिकटॉक स्टार सनाला ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे. 

सना युसुफची हत्या का केली?  

टिकटॉक स्टार सना युसुफची हत्या का केली? यामागील हेतू अद्याप स्पष्ट झालेला नसला तरीसुद्धा यामागे काही वैयक्तिक वाद, सामाजिक तणाव यांसारखी कारणं असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

कोण होती सना यूसुफ? 

चित्रालची राहणारी टिकटॉकर सना युसूफ हिनं सोशल मीडियावर मोठी प्रसिद्धी मिळवली होती. सना युसूफचे इंस्टाग्रामवर चार मिलियनहून अधिक फॉलोअर्स होते. तिच्या हत्येच्या वृत्तानं तिच्या जगभरातील चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. सध्या सोशल मीडियावर चाहत्यांकडून सना युसुफला श्रद्धांजली वाहिली जात आहे.                                                                       

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Bollywood Actress Gracy Singh News: आमिर खान, संजय दत्त, अजय देवगणची हिरोईन बनली ब्रह्मकुमारी, ग्लॅमरस जग सोडून अध्यात्माच्या वाटेवर