Pachhadlela Movie Wada : मराठी सिनेसृष्टीतील नेहमी चर्चेत राहणारे चित्रपट अनेक आहेत. मात्र, मराठीतील हॉरर आणि तितकाच विनोदी असलेला चित्रपट म्हणजे दिग्दर्शक आणि अभिनेते महेश कोठारे यांनी दिग्दर्शित केलेला पछाडलेला हा सिनेमा... या सिनेमात मराठीतील अनेक दिग्गज कलाकारांनी महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. भरत जाधव यांची भूमिका असेल किंवा सिनेमातील बाब्या, गजरा मावशी, किरकिरे सारखी असंख्य पात्र आजही प्रेक्षकांच्या मनात घरं करुन आहेत.
"पछाडलेला" हा चित्रपट 2004 साली प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सुप्रसिद्ध दिग्दर्शक महेश कोठारे यांनी केले आहे. भरत जाधव, लक्ष्मीकांत बेर्डे, अश्विनी भावे, आणि इतर कलाकारांच्या सशक्त अभिनयाने हा चित्रपट अप्रतिम ठरला. प्रेक्षकांनी या सिनेमाला भरभरुन प्रतिसादही दिला. मात्र, या पात्रांशिवाय हा चित्रपट यशस्वी होण्यामागे महत्त्वाचं कारणं म्हणजे शूटींग स्पॉट .... या सिनेमात दाखवण्यात आलेला वाडा आजही प्रेक्षकांच्या मनात आहे. काही क्षणासाठी का होईना पछाडलेला सिनेमातील वाडा प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवतो... मात्र, हा कुठे आहे? याबाबत आपण जाणून घेऊयात..
पछाडलेला सिनेमातील हा वाडा कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुक्यात आहे. Pant Amatya Bawadekar Wada असं या वाड्याचं नाव आहे. या वाड्यात अनेक सिनेमांचं शूटींग झालंय. चारी बाजूंनी निसर्ग असलेल्या ठिकाणी हा वाडा बांधण्यात आलेला आहे. हा वाडा पाहाण्यासाठी आज देखील मोठी गर्दी झालेली पाहायला मिळते.
एकूणच, "पछाडलेला" हा मराठी चित्रपटांमधील हॉरर आणि विनोदी असलेला महत्त्वाचा चित्रपट आहे. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी या सिनेमात एका पुजाऱ्याची भूमिका पार पाडलेली आहे. तर भरत जाधव यांच्या अंगात या वाड्यात भटकणारे आत्मे शिरत असतात.
चित्रपटाची कथा एका तरुणाच्या आजूबाजूने फिरते, जो एका जुन्या वाड्यात राहायला येत असते. सुरुवातीला सर्व काही सुरळीत वाटते, परंतु लवकरच त्याला त्या वाड्यात काहीतरी विचित्र घडतेय याची जाणीव होऊ लागते. त्या वाड्यात एका आत्म्याचे अस्तित्व आहे आणि त्याचे रहस्य उलगडण्याच्या प्रयत्नात त्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सिनेमा पाहात असताना भयावह प्रसंगांमधून जात असताना त्याला हास्यविनोदाच्या प्रसंगांमुळे थोडा विरंगुळाही मिळतो.
इतर महत्त्वाच्या बातम्या