OTT Top Crime Thriller : ओटीटी प्लॅटफॉर्मवर (OTT Platform) सत्य घटनांवर आधारित असंख्य चित्रपट आणि वेब सिरीज (Web Seies) आहेत. आज आम्ही तुमच्यासाठी बिहारमधील (Bihar) प्रसिद्ध घटनेवर आधारित एका ओटीटी (OTT Movies) चित्रपटाबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. सिनेप्रेमींना सत्य घटनांवर आधारित चित्रपट आणि वेब सिरीज पहायला आवडते. ओटीटी प्लॅटफॉर्मवर असं बरंच काही आहे. आज आम्ही तुम्हाला ओटीटीवरील अशाच एका क्राईम थ्रिलरबाबत सांगणार आहोत. ही कथा बिहारमधील एका प्रसिद्ध घटनेवर आधारित आहे.
बिहारमधल्या सत्य घटनेवर आधारित सिनेमा
बिहार हे भारतातील काही मोजक्या राज्यांपैकी एक आहे, जिथे अनेक मोठे गुन्हे घडले आहेत. त्यापैकी एका घटनेची कहाणी 2024 मध्ये प्रदर्शित झालेल्या एका ओटीटी चित्रपटात दाखवण्यात आली होती. या 2 तास 15 मिनिटांच्या सिनेमाची कथा बिहार राज्यातील शेल्टर होममधील मुलींभोवती फिरते. त्यात उपस्थित असलेल्या काही मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या बातम्यांनी संपूर्ण बिहार हादरून गेला होता.
एका महिला रिपोर्टरनं हा संपूर्ण घोटाळा उघड केला होता आणि व्यवस्थेचा घृणास्पद चेहरा सर्वांसमोर उघड केला होता. दरम्यान, यावेळी रिपोर्टरला ज्या आव्हानांना तोंड द्यावं लागतं, ते या ओटीटी चित्रपटाचा थरार आणखी वाढवतं. आम्ही तुम्हाला गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित करण्यात आलेल्या 'भक्षक' सिनेमाबद्दल सांगत आहोत.
'भक्षक' सिनेमा सुपरस्टार शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली तयार करण्यात आला होता. अभिनेत्री भूमी पेडणेकरनं बिहारमधील मुझफ्फरपूर येथील शेल्टर होमची घटना उघड करणाऱ्या महिला रिपोर्टरची मुख्य भूमिका साकारली होती. आदित्य श्रीवास्तव, संजय मिश्रा, सई ताम्हणकर, सूर्या शर्मा आणि समित सुदीक्षा या कलाकारांनी या सिनेमात महत्त्वाच्या भूमिका केल्या होत्या.
IMDB वर मिळालंय टॉप रेटिंग
भूमी पेडनेकर भक्षक ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स मस्ट वॉच क्राईम थ्रिलरपैकी एक आहे. याचा अंदाज आप इंटरनेट मूव्ही डेटाबेस (IMDb) च्या वतीनं फिल्मला पॉझिटिव्ह रेटिंग देण्यात आलं आहे. दरम्यान, IMDb नं या चित्रपटाला 7.2/10 असं शानदार रेटिंग दिलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :