Jaran Box Office Collection: सध्या मराठी सिनेमांकडे (Marathi Movie) प्रेक्षकांचा कल वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आधीच मराठीत भयपट (Marathi Horror Movie) तसे फार कमी आलेत, त्यामुळे आधी हॉलिवूड (Hollywood) आणि त्यानंतर बॉलिवूडमध्ये (Bollywood) येणारे हॉरर सिनेमांवर (Horror Movie) प्रेक्षकांना अवलंबून राहावं लागत होतं. अशातच आता मराठीतही दर्जेदार हॉरर-थ्रीलर सिनेमे (Horror-Thriller Cinema) यायला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच झी5 वर रिलीज करण्यात आलेली 'अंधार माया' वेब सीरिज आणि त्यानंतर थिएटर्समध्ये प्रदर्शित करण्यात आलेला 'जारण' (Jaran Movie) सध्या थिएटरमध्ये धुमाकूळ घालत आहे. अमृता सुभाष (Amruta Subhash) आणि अनिता दाते (Anita Date) अभिनित 'जारण' सिनेमा प्रेक्षकांना खूप आवडत असून सध्या बॉक्स ऑफिसवर गाजतोय. एवढंच नाहीतर रिलीजच्या बाराव्या दिवसापर्यंत (Jarann Movie Box Office Collection) सिनेमानं चक्क कोटींच्या घरात कमाई केली आहे.
हिंदीत 'भुल भुलैय्या' (Bhool Bhulaiya), 'वेलकम' (Welcome) असे एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट देणारे अनिस बाझमी 'जारण' या मराठी चित्रपटाचे प्रस्तुतकर्ता आहेत. आणि हिंदीप्रमाणे त्यांनी मराठीतही हा चित्रपट हिट ठरवून दाखवला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, सिनेमानं बारा दिवसांत 4.19 कोटींची कमाई केली आहे.
मराठीतील गुणी अभिनेत्रींमध्ये समाविष्ट होणाऱ्या अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या 'जारण' चित्रपटाला सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. 'जारण'च्या निमित्तानं प्रेक्षकांना सिनेमागृहात भय, अंधश्रद्धा आणि वास्तव यांचा अनोखा संगम अनुभवायला मिळतोय.
काही दिवसांपूर्वी मराठीत हिट ठरलेल्या 'आता थांबायचं नाय', 'गुलकंद' या सिनेमांपाठोपाठ अमृता सुभाष, अनिता दाते यांच्या 'जारण'नं बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली आहे. 'सॅकनिल्क'नं दिलेल्या वृत्तानुसार, 6 जूनला प्रदर्शित झालेल्या 'जारण' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर गेल्या 12 दिवसांत एकूण 4.19 कोटी कमावले आहेत.
शेवटपर्यंत खिळवून ठेवतो 'जारण'
अमृता सुभाष आणि अनिता दाते यांच्या अभिनयानं फुललेला 'जारण' सिनेमा ट्विस्ट आणि टर्न्सनी भरलेला आहे. जिथे हे खरंच हॉरर कथा आहे की मनोवैज्ञानिक थ्रिलर हे ठरवताना तुम्ही भंडावून जाता. सिनेमा सुरू झाल्यापासून अगदी संपेपर्यंत तुम्हाला खिळवून ठेवतो. तुम्ही अंदाज बांधत राहता आणि हा सिनेमा प्रत्येक वळणावर तुमचे अंदाज खोटे ठरवतो आणि एक अनपेक्षित वळण घेऊन येतो. 'जारण'ची कथा अधिक खोलवर जाऊन थेट आपल्या मानसिकतेवर प्रहार करते.
सिनेमाच्या प्रत्येक प्रेममध्ये अमृता सुभाषचा सर्वोत्तम अभिनय पाहायला मिळतो. पण, अगदी लहानशी पण संपूर्ण सिनेमात आपला प्रभाव कायम ठेवणारी अनिदा दातेची भूमिका काळजाचा ठोका चुकवते. याशिवाय किशोर कदम, ज्योती मालशे, राजन भिसे, सीमा देशमुख, विक्रम गायकवाड आणि इतर कलाकारांनीही आपली कामगिरी चोख पार पाडली आहे.
पाहा ट्रेलर :