94TH OSCARS : अॅकॅडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने आज 94 व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी 10 कॅटेगिरींमधील शॉर्टलिस्ट झालेल्या चित्रपटांची नावं जाहीर केली आहेत. डॉक्युमेंटरी फिचर, डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेक्ट, आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म, मेकअप आणि हेअर स्टायलिंग, संगीत (ओरिजनल स्कोअर), संगीत (ओरिजनल गाणे), अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म, लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्म, ध्वनी आणि व्हिज्युअल इफेक्ट्स या कॅटेगिरीतील नामांकनांची नावं जाहिर करण्यात आली आहे. ऑस्कर पुरस्कारांचे नामांकन ठरवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या मतदानाचा कालावधी हा 27 जानेवारी, 2022 ते 1 फेब्रुवारी, 2022 असा आहे. 94 व्या अकादमी पुरस्काराची नामांकने 8 फेब्रुवारी 2022 रोजी जाहीर केली जातील. 94 वा ऑस्कर पुरस्कार सोहळा हा 27 मार्च 2022 रोजी होणार आहे.
डॉक्युमेंटरी फिचर
94 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी डॉक्युमेंटरी फिचर श्रेणीमध्ये पंधरा चित्रपट शॉर्टलिस्ट झाली आहेत. या श्रेणीत एकशे अडतीस चित्रपट पात्र ठरली होती. नावं शॉर्टलिस्ट करण्यासाठी डॉक्युमेंटरी भागाचे सदस्य मत देतात. त्यामधून नावं निश्चित केली जातात.
शॉर्टलिस्ट केलेल्या चित्रपटांची नावं
Ascension
Attica
Billie Eilish: The World’s a Little Blurry
Faya Dayi
The First Wave
Flee
In the Same Breath
Julia
President
Procession
The Rescue
Simple as Water
Summer of Soul (…Or, When the Revolution Could Not Be Televised)
The Velvet Underground
Writing with Fire
डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेक्ट
94 व्या ऑस्कर पुरस्कारासाठी माहितीपट डॉक्युमेंट्री शॉर्ट या कॅटेगिरीमध्ये पंधरा चित्रपट शॉर्टलिस्ट झाली आहेत.
डॉक्युमेंट्री शॉर्ट सबजेक्ट या कॅटेगिरीमध्ये शॉर्टलिस्ट झालेल्या माहितीपटांची नावं
Águilas
Audible
A Broken House
Camp Confidential: America’s Secret Nazis
Coded: The Hidden Love of J. C. Leyendecker
Day of Rage
The Facility
Lead Me Home
Lynching Postcards: 'Token of a Great Day'
The Queen of Basketball
Sophie & the Baron”
Takeover
Terror Contagion
Three Songs for Benazir
When We Were Bullies
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या टॅगेगिरीमध्ये 92 फीचर फिल्म्स या पात्र ठरली होत्या. त्यापैकी पंधरा चित्रपट हे शॉर्टलिस्टेड झाल्या आहेत.
शॉर्टलिस्टेड झालेल्या आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म
ऑस्ट्रिया, “Great Freedom”
बेल्जियम, “Playground”
भूतान, “Lunana: A Yak in the Classroom”
डेन्मार्क, “Flee”
फिनलंड, “Compartment No. 6”
जर्मनी, “I’m Your Man”
आइसलँड, “Lamb”
इराण, “A Hero”
इटली,“The Hand of God”
जपान,“Drive My Car”
कोसोवो,“Hive”
मेक्सिको, “Prayers for the Stolen”
नॉर्वे,“The Worst Person in the World”
पनामा, “Plaza Catedral”
स्पेन,“The Good Boss”
मेकअप आणि हेअर स्टायलिंग
मेकअप आणि हेअर स्टायलिंग या कॅटेगिरीसाठी दहा चित्रपटांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. ही नावं शॉर्टलिस्ट करण्यासाठी परीक्षकांनी मेक-अप आर्टिस्ट आणि हेअर स्टायलिंग यांची मुलाखत घेण्यात आली होती.
शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या चित्रपटांची नावं
कमिंग 2 अमेरिका (Coming 2 America)
क्रुएला (Cruella)
सायरानो (Cyrano)
डून (Dune)
द आइज ऑफ टॅमी फाये (The Eyes of Tammy Faye)
हाऊस ऑफ गुची House of Gucci
नाइटमेअर Alley (Nightmare Alley)
नो टाइम टू डाय (No Time to Die)
द स्यूसाइड स्क्वाड (The Suicide Squad)
द वेस्ट साइड स्टोरी (West Side Story)
इतर बातम्या :
Zee-Sony merger : झी आणि सोनीचं विलिनीकरण, काय आहे करार?
Kangana Ranaut : 'या चित्रपटानं बदललं माझं जीवन'; कंगनानं सांगितला अनुभव, कोणता आहे चित्रपट?