Gene Hackman Death: अभिनेता जीन हॅकमन (Gene Hackman) यांना वेगळ्या अशा ओळखीची अजिबात गरज नाही. आपल्या उत्तम अभिनयानं जगभरात प्रसिद्धी मिळवणाऱ्या या गुणी कलाकारानं जगाचा निरोप घेतल्याची माहिती मिळत आहे. अभिनेता त्याच्या न्यू मेक्सिको येथील घरात मृतावस्थेत आढळल्याची माहिती मिळत आहे.
ऑस्कर विजेता स्टार जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी अराकावा (Betsy Arakawa) हे त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळल्यानं खळबळ माजली आहे. दोन्ही पती-पत्नीसोबतच घरात त्यांच्या कुत्र्याचाही मृतदेह आढळून आल्याची माहिती मिळत आहे. ऑस्कर पटकावणाऱ्या अभिनेत्याचा संशयास्पद मृत्यू झाल्यामुळे फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ माजली आहे.
द गार्डियननं दिलेल्या वृत्तानुसार, 95 वर्षीय जीन हॅकमन आणि त्यांची 63 वर्षीय शास्त्रीय पियानोवादक पत्नी बेट्सी अराकावा हे बुधवार, 26 फेब्रुवारी रोजी दुपारी त्यांच्या राहत्या घरात मृतावस्थेत आढळले. सांता फेनं यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली. दरम्यान, प्रेस असोसिएशननं दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
कधी अन् कसा झाला जीन हॅकमॅन आणि पत्नीचा मृत्यू? तपास सुरू
शेरिफ मेंडोजा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या या प्रकरणात कोणतीही गडबड किंवा काहीही संशयास्पद बाब समोर आलेली नाही. त्यासोबतच हेदेखील समजू शकलेलं नाही की, जीन हॅकमॅन आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू केव्हा आणि कसा झाला?
जोडप्याचा मृत्यू अन् तपास... काय आलं समोर?
शेरिफनं दिलेल्या माहितीनुसार, दुपारी जीन हॅकमॅन, त्यांची पत्नी आणि पाळीव कुत्रा तिघांचाही संशयास्पद मृत्यू झाला आहे. संशयास्पद मृत्यू प्रकरणी सध्या पोलिसांचा तपास सुरू आहे. मी सध्या फक्त इतकच सांगू शकतो की, सध्या प्रकरणाची कसून चौकशी सुरू आहे. तसेच, सर्च वॉरंटला मंजुरी मिळण्याची वाट पाहत आहोत. मी संपूर्ण कम्युनिटी आणि आसपासच्या लोकांना कोणताही धोका नसल्याचं जाहीर करतो. तसेच, कोणीही भिती बाळगू नये, असं आवाहनही करतो."
एकाच घरात तीन मृतदेह आढळून आल्यामुळे पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे. बाथरूममध्ये त्याच्या त्याच्या पत्नीच्या डेडबॉडीजवळ एक औषधाची बाटली आणि त्यातून सांडलेल्या गोळ्या आढळून आल्या. तेव्हापासून लोक हे प्रकरण आत्महत्येशी संबंधित असल्याचं बोलत आहेत. दरम्यान, काय खरं आणि काय खोटं? हे येणारी वेळच सांगेल.
पोलीस या प्रकरणानं हैराण झाले आहेत. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, एकाच वेळी एवढे मृत्यू एखादा गॅस लीक झाल्यामुळेच होऊ शकतात. पण, आश्चर्याची बाब म्हणजे, तपासादरम्यान कोणताही गॅस लीक झाल्याचं निष्पन्न झालेलं नाही. दरम्यान, पोलिसांकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.