Orry Summoned By Mumbai Police: सोशल मीडिया (Social Media) इन्फ्लुएन्सर ऑरीच्या (Orry Summoned By Mumbai Police) अडचणींत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ऑरीला (Orry) समन्स धाडलं आहे. 252 कोटींच्या ड्रग्ज घोटाळ्या प्रकरणी अँटि नारकोटिक्स सेलनं (Anti Narcotics Cell) ऑरीला समन्स जारी केलं आहे. पोलिसांनी ऑरीला 20 नोव्हेंबर 2025 रोजी 10 वाजता अँटि नारकोटिक्स सेलच्या घाटकोपर येथील युनिटमध्ये चौकशीसाठी उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

Continues below advertisement

मुंबई पोलिसांनी 252 कोटी रुपयांच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपी मोहम्मद सलीम मोहम्मद सुहेल शेख याला अटक केली आहे. चौकशीदरम्यान, आरोपीनं धक्कादायक खुलासा करत महत्त्वाची माहिती शेअर केली. त्यानं सांगितलं की, तो भारतात आणि परदेशात ड्रग्ज पार्ट्या आयोजित करतो आणि त्या पार्ट्यांना ड्रग्ज पुरवतो.

दरम्यान, सध्या सिनेसृष्टीत ड्रग्ज प्रकरण गाजत असून बॉलिवूडचे अनेक बडे सेलिब्रिटी यात सहभागी असल्याचा आरोप केला जात आहे. अलिकडेच, मुंबई पोलिसांच्या अँटिकॉरिक्स सेलनं अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा दुबईस्थित भागीदार सलीम डोला याच्याकडून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या ड्रग्ज सिंडिकेटचा पर्दाफाश केलेला. 

Continues below advertisement

मुंबई पोलिसांनी धाडलं ऑरीला समन्स

मुंबई पोलिसांनी धाडलं ऑरीला समन्स धाडलं असून आज चौकशीसाठी उपस्थित राहण्याचे निर्देश दिले आहेत. ऑरीच्या आधी, नोरा फतेहीचंही या प्रकरणात नाव आलेलं. नोरानं सोशल मीडिया पोस्टद्वारे या प्रकरणावर आपलं मौन सोडलेलं, तिनं सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलेलं की, "मी पार्ट्यांमध्ये जात नाही. मी सतत काम करत असते. मी वर्काहोलिक आहे. माझं कोणतेही वैयक्तिक आयुष्य नाही... मी अशा लोकांशी स्वतःला जोडतच नाही. जेव्हा मी सुट्टीवर असते, तेव्हा मला दुबईतील माझ्या घरी आणि समुद्रकिनाऱ्यावर मित्रांसोबत वेळ घालवायला आवडतं..."

दाऊद इब्राहिमचा मित्र चालवत होता ड्रग्ज सिंडिकेट

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा मित्र सलीम डोला हा ड्रग्ज सिंडिकेट चालवत असल्याची माहिती मुंबई पोलिसांना मिळाली. या सिंडिकेटनं देशभरातील सात ते आठ राज्यांमध्ये मेफेड्रोन (एमसीएटी), म्याऊ म्याऊ आणि आइस सारख्या ड्रग्जचा पुरवठा केला आणि मोठ्या प्रमाणात परदेशातही त्यांची तस्करी केली.

मुंबई गुन्हे शाखेव्यतिरिक्त, अंमलबजावणी संचालनालय देखील या संपूर्ण नेटवर्कची चौकशी करत आहे. या ड्रग्ज तस्करीतून मिळणारे पैसे हवाला आणि रिअल इस्टेटद्वारे लाँडरिंग केले जात असल्याचा ईडीला संशय आहे. मुंबई गुन्हे शाखा लवकरच या सर्व व्यक्तींना समन्स बजावेल आणि त्यांचे जबाब नोंदवेल.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Saif Ali Khan Buy Property In Mumbai: सैफ अली खानचा नवाबी थाट, मुंबईत खरेदी केली कोट्यवधींची नवी प्रॉपर्टी; अभिनेत्याचं नेटवर्थ किती?