Horoscope Today 20 November 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 20 नोव्हेंबर 2025, आजचा वार गुरूवार आहे. आज कार्तिक अमावस्येचा दिवस ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने खास आहे. आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. देवी लक्ष्मीच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज नवीन विचार आणि कार्यपद्धती यांचे स्वागत कराल, नोकरीमध्ये आळस सोडून पुन्हा सक्रिय बनाल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज तुमची प्रतिष्ठा वाढेल, महिलांना नवीन जबाबदाऱ्या अंगावर घ्याव्या लागतील
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज तुमच्या जीवनातील कोणाचेही वर्चस्व तुम्ही सहन करणार नाही, परंतु कोणत्याही बाबतीत आताताईपणा करू नका
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज कार्यक्षमता चांगली राहील, काही गोष्टी फायद्याच्या ठरू शकतात
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांनो आज तुमच्याकडे जी कला आहे त्या कलेचा ध्यास घेतलात तर, त्यातून तुम्हाला मिळणाऱ्या आनंदाची बरोबरी कोणत्याही गोष्टीशी होऊ शकणार नाही
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज आर्थिक दृष्टीने थोडा पेचात टाकणारा दिवस आहे, संकटाशी टक्कर देऊन ध्येय गाठण्यात आघाडीवर राहाल
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज संततीच्या प्रगतीचा आलेख उंचावेल पैसा हाती येण्याची गती मंदावेल, त्यामुळे थोडी चिंता लागून राहिल
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज अचानक उद्भवणाऱ्या खर्चाची तोंड मिळवणी करण्यास शक्ती खर्च पडेल, कष्टाला पर्याय नाही
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज आपल्या कामाकडे जास्तीत जास्त लक्ष द्यावे लागेल, महिलांना पाहुण्यांचे आदरातिथ्य करावे लागेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज चिकाटी आणि दीर्घोद्योग करून यश मिळाल्यानंतर जे समाधान तुम्हाला मिळणार आहे ते वादातीत असेल
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज मुलांच्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये सुधारणा झाल्याचे लक्षात येईल, त्यांची सर्व बाबतीत सुधारणा होईल
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज दुसऱ्याला एखादी गोष्ट सांगण्याची तुमची पद्धत सहज सोपी चांगली असू द्या, रागाचा पारा वाढवू देऊ नये.
हेही वाचा
Mahalakshmi Rajyog 2025: दु:खाचे दिवस गेले, मार्गशीर्ष महिना 4 राशींची भरभराट करणार! 20 नोव्हेंबरला महालक्ष्मी राजयोग बनतोय, पैसा, करिअर, प्रेम...
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)