Orhan Awatramani : सध्या सिनेक्षेत्रात आणि फॅशन इंडस्ट्रीमध्ये ओरीचे (orry) नाव तुफान चर्चेत आहे. बॉलिवूड सेलिब्रिटींच्या सध्याच्या प्रत्येक पार्टीत ओरी असतोच. त्याच्याशिवाय सध्या बॉलिवूडच्या पार्ट्याच पूर्ण होत नाहीयेत. मायदेशात असूद्या किंवा विदेशात बॉलिवूडच्या पार्टीत ओरीचा (orry) दंगा असतोच. त्यानंतर तो तिथेच थांबत नाही. तर पार्टीतील प्रत्येक फोटोही शेअर करतो. त्यामुळे अनेकांना प्रश्न पडतो की, ओरी नेमकं काम करतो. तो एकाच वेळी वेगवेगळ्या इव्हेंट्सला कसा पोहोचतो. ओरीचे (orry) कामाबाबत ना बॉलिवूड इंडस्ट्रीला माहिती आहे. ना प्रेक्षकांना..मात्र, ओरी एकाच वेळी चार-चार इव्हेंटला कसा जातो? याची माहिती समोर आली आहे. 


ओरी उर्फ ओरहान अवत्रमणी हा नुकताच पॉप्युलर चॅट शो ‘कॉफी विद करण’मध्ये दाखल झाला होता. या दरम्यान त्याने आपल्या उपस्थितीबाबत हैराण करणारे खुलासे केले आहेत. आत्तापर्यंत तुम्ही अनुष्का शर्मा, आलिया भट्ट आणि बॉलिवूडच्या अभिनेत्रींसारखे दिसणारे लोक पाहिले असतील. काही अभिनेत्री आपल्या प्रमाणे दिसणाऱ्या लोकांसोबत फोटोही पोस्ट करतात. मात्र, तुम्हाला माहिती हे माहिती नसेल, की, ओरीसारखा सेम टू सेम दिसणारा आणखी एक व्यक्ती आहे. 


ओरहाण अवत्रमणी म्हणजेच ओरीप्रमाणे दिसणारे एक नाही दोन लोक आहेत. याबाबतचा खुलासा खुद्द ओरीनेच केला आहे. ‘कॉफी विद करण’या शोमध्ये त्याने खुलासे केले आहेत. या शोमध्ये ओरी करणला म्हणतो की, "तुम्ही मला आत्ता म्हणालात ओरी इथे असतो. तिथे असतो. तो प्रत्येक ठिकाणी असतो. मला या गोष्टीचा फार अभिमान आहे की, प्रत्येक ठिकाणी असतो. पण लोक विसरतात की, माझ्याकडून जादू नाही. मी प्रत्येक ठिकाणी जाऊ शकत नाही. माझ्यासारखे दिसणारे आणखी 3 लोक आहेत."


ओरीसारख्या दिसणाऱ्या लोकांना ओळखणे अवघड (orry)


ओरी पुढे बोलताना म्हणाला की, माझ्या सारखे दिसणारे तिघेही सायलेंट आहेत. मी केवळ त्यांना त्याच ठिकाणी पाठवतो. जिथे काही बोलण्याची गरज नसते. पुढे बोलताना ओरी म्हणाला की, तुम्ही जर माझ्यासारख्या दिसणाऱ्या तिघांना एकत्र उभे केले, तर तुम्हीही ओळखू शकणार नाहीत.