Nita Ambani Viral Video from NMACC : मुंबईतील नीता अंबानी (Neeta Ambani) कल्चरल सेंटरला नुकतच एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमित्ताने तिथे एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाची सूत्र स्वत: नीता अंबानी यांनी साभांळली होती. या कार्यक्रमाची सुरुवात करताना नीता अंबानी यांनी मराठीतून सुरुवात केली. यावेळी त्यांनी म्हटलं की, 'नमस्कार मंडळी कसे आहात?' पण या कार्यक्रमात विशेष चर्चा झाली ती अजय-अतुलच्या (Ajay-Atul) यांच्या परफॉर्मन्सची. त्यातच अजय-अतुल यांनी सादर केलेल्या झिंगाट गाण्यावर नीता अंबानी यांच्यासह कार्यक्रमातील सगळ्यांनी ठेका धरला.
‘अजय-अतुल लाइव्ह’ या कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या या लाडक्या जोडीने साऱ्यांचीच मनं जिंकून घेतलीत. या कार्यक्रमाचा एक खास व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला आहे. त्यामध्ये नीता अंबानी यांनी स्वत: झिंगाटच्या तालावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. त्यातच अजय-अतुल यांच्या शो दरम्यान नीता अंबानी यांनी मराठीतून संवाद साधल्याचं पाहायला मिळालं. नीता अंबानी यांच्या मराठमोळ्या पेहरावामुळे आधीच साऱ्यांची मनं जिंकून घेतली होती. त्यातच आता त्यांच्या या मराठमोळ्या अंदाजामुळे साऱ्यांनाच भुरळ पाडल्याचं पाहायला मिळतंय.
नीता अंबानी यांनी साधला मराठीतून संवाद
नीता अंबानी यांनी यावेळी मराठीतून संवाद साधल्याचं पाहायला मिळालं. त्यांनी म्हटलं की, म्ही आहात म्हणूनच या सर्व कला जिवंत आहेत, तुम्ही आहात म्हणून भारतीय संस्कृतीचा वारसा जिवंत आहे आणि तुम्ही आहात म्हणूनच नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर आहे.' तसेच यावेळी नीता अंबानी यांनी उपस्थित प्रेक्षकांचे देखील आभार मानले. इतकचं नव्हे तर या कार्यक्रमाची सुरुवात देखील अगदी मराठमोळ्या अंदाजात झाली असल्याचं चित्र होतं. दरम्यान नीता अंबानी यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायर तुफान व्हायरल झाला असल्याचं पाहायला मिळालं. तसेच त्यांनी यावेळी अजय-अतुल यांचे आभार देखील व्यक्त केलेत.