Nilesh Sable on Chala Hawa Yeu Dya : गेल्या काही दिवसांपासून झी मराठीवरील 'चला हवा येऊ द्या', या कार्यक्रमातून अभिनेते निलेश साबळे आणि अभिनेते भाऊ कदम यांना डच्चू देण्यात आला, अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, निलेश साबळे आणि भाऊ कदम यांची या कार्यक्रमातून हकालपट्टी झाली नसून त्यांनी स्वत: हा शो सोडल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे स्वत: निलेश साबळे यांनी एक व्हिडीओ शेअर करुन याबाबतचा खुलासा केला आहे. यावेळी त्यांनी 'चला हवा येऊ द्या' कार्यक्रम का सोडला? याबाबतचा खुलासा केलाय. निलेश साबळे नेमकं काय म्हणाले? जाणून घेऊयात.. 

Continues below advertisement


निलेश साबळे म्हणाले, सध्या मी एका सिनेमाचं काम करत आहे आणि त्यात मी अडकलेलो आहे. काही वैयक्तिक अडचणीही होत्या. या चित्रपटाचं शूटींग अजून दीड महिना चालणार आहे. त्यामुळे आणि तारखा जुळत नसल्यामुळे मी स्वत:हून त्या कार्यक्रमातून माघार घेण्याची विनंती केली. याचा अर्थ असा नव्हता की मला तो कार्यक्रम करायचाच नव्हता किंवा मी स्पष्टपणे नकार दिला. मी माझ्या इच्छेनं सध्या तरी त्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला. हाच निर्णय भाऊ कदम सरांनीही घेतला आहे. सध्या तेही माझ्यासोबत याच सिनेमात काम करत आहेत आणि म्हणूनच ते देखील त्या कार्यक्रमात सहभागी नाहीत. या कार्यक्रमातून आम्ही दोघंही अनुपस्थित आहोत आणि त्यामागचं खरं कारण जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न केलाय का?






दरम्यान, यावेळी निलेश साबळे यांनी राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी केलेल्या आरोपांना देखील प्रत्त्युत्तर दिलंय. याबाबत बोलताना निलेश साबळे म्हणाले,  शरद उपाध्ये सरांना पाणी द्यायचं, ही जबाबदारी माझी आहे की नाही? याचा प्रश्न मला अजूनही पडलाय. कारण तुम्हालाही आठवत असेल मी स्टेजवर होतो. तेव्हा उपाध्ये सर त्यांच्या रुममध्ये होते. माझा सराव उरकून मी प्रत्येक कलाकाराच्या रुममध्ये गेलो. त्यावेळी तुम्हाला पाणी मिळाल नाही? याला मी जबाबदार आहे का? मला अजूनही कळत नाही. 


निलेश साबळेंनी मला स्टेजवर जाताना स्माईल दिली नाही, असंही उपाध्ये म्हणाले. आपण त्यांचं हे वाक्य धरुयात.. आणि त्याचं दुसरं वाक्य हे की, निलेश साबळे प्रत्येक कलाकाराच्या रुममध्ये जात होते. आणि शेवटी चार वाजता ते माझ्याकडे आले. तुमच्याकडे चार वाजता आलो म्हणजे तुमच्या रुममध्ये आपला काहीतरी संवाद झालाय. मी मोठेपणा म्हणून सांगत नाही. पण जेवढे मोठे कलाकार असतात, त्यांच्या पाया पडूनच मी रुममध्ये जातो. तसंच मी शरद उपाध्ये यांच्याबद्दलही केलं. तुम्ही त्यावेळी मला आशीर्वाद दिले. कौतुकही केलं, असं प्रत्युत्तरही निलेश साबळे यांनी उपाध्ये यांना दिलं. 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


राशीचक्रकार शरद उपाध्ये म्हणाले, अहंकारी, गर्विष्ठ, अध:पतन, आता निलेश साबळेंचं उत्तर! VIDEO