Nilesh Sable reply Sharad Upadhye : झी मराठीवरील लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आता नव्या स्वरुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दरम्यान, नव्या स्वरुपात येणाऱ्या या कार्यक्रमात अभिनेते निलेश साबळे यांना डच्चू देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर राशीचक्रकार शरद उपाध्ये यांनी निलेश साबळेंबद्दल अहंकार, गर्विष्ठ, अध:पतन असे शब्द वापरले होते. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणानंतर निलेश साबळे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
निलेश साबळे म्हणाले, सन्माननीय राशीचक्रकार शरद उपाध्ये सर यांच्याशी मला थेट संवाद साधता आला असता. त्यांचाही नंबर माझ्याकडे आहे. माझाही फोन नंबरही त्यांच्याकडे आहे. परंतू त्यांना काल सोशल मीडियावरुनच व्यक्त व्हायचं होतं. त्यामुळे मी जरी सोशल मीडिया फार वापरत नसलो. तरी आज थोडा फार वापरण्याची वेळ आली. मला वाटायचं आपण सोशल मीडियावर नेहमी मनोरंजनाचे व्हिडीओ शेअर करावेत. आपलं काम लोकांना हसवणे आहे, तेवढचं आपण करुयात, असं वाटायचं. कधीतरी असा एक व्हिडीओ एम्फॉरमेटिव्ह किंवा जे खरं घडलंय, त्याचा व्हिडीओ करावा लागेल, असं मला वाटलं नव्हतं. पण ठीक आहे. वेळ असते आणि त्या त्या वेळी त्या त्या गोष्टी कराव्या लागतात.
पुढे बोलताना निलेश साबळे म्हणाले, सन्माननीय शरद उपाध्ये सर तुमची आणि माझी एक ते दोन वेळेस भेट झाली होती. कशी तीही मी प्रेक्षकांना सांगणार आहे. तुम्ही माझ्यासाठी गुरुतुल्य आहात. गुरुतुल्य होतात आणि पुढेही राहाल. परंतु तुम्ही काल तुम्ही तुमच्या पोस्टची सुरुवात 'झी मराठीने निलेश साबळेंना डच्चू दिला', अशी झाली. निलेश साबळे यांना डच्चू दिला म्हणालात, तुम्हाला यातली काही माहिती आहे का? डच्चू दिला हकालपट्टी केली? असं म्हणतात, त्यांना सर्वांना माहिती द्यायची आहे. त्या कार्यक्रमाला मी नाही म्हटलं आहे. तुम्हाला माहिती नसेल, त्यामुले म्हणतोय की, तुम्ही ही माहिती घ्यायला हवी होती.
शरद उपाध्ये सर तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त लोक फॉलो करतात. आणि तुम्हाला गुरु म्हणून फॉलो करतात. त्यामुळे तुमची जबाबदारी जास्त होती. झी मध्ये तुमच्याही भरपूर ओळखी आहेत. तुम्ही एक फोन करुन विचारु शकला असतात की काय झालंय? निलेश साबळे या कार्यक्रमात का नाही? तुम्ही झी मराठीमध्ये कोणाला तरी विचारायला हवं होतं. माहिती घ्यायला हवी होती. झी मराठीच्या हेड पदावर असणाऱ्या व्यक्तीने मला अनेक कॉल केले होते. मी नाव घेऊन बोलू शकतो. सन्माननीय रोहन राणे हे नॉन फिक्शन हेड होते. त्यांनी सहा महिन्यात अनेक वेळा कॉल केले होते. आपण चला हवा येऊ द्या सुरु करतोय.. डॉक्टर ते तुमच्याशिवाय होणार नाही. एकदा आपण मीटिंग करायला पाहिजे. दोन महिन्यांपूर्वी आमची सविस्तर मीटिंग झाली. ही बैठक वरळीच्या ऑफिसला झाली. मी सध्या एक सिनेमा करतोय, त्यामध्ये मी अडकलो. माझ्या काही अडचणी होत्या. त्याच शूटींग आणखी दीड महिना सुरु राहणार आहे. त्यामुळे आणि तारखा न जुळल्यामुळे माघार घ्यायची मी रिक्वेस्ट केली. याचा अर्थ असा नव्हता की, मला कार्यक्रम करायचा नव्हता. मी नकार दिला. मी स्वत:हून या कार्यक्रमातून बाहेर पडलोय. मी स्वत; म्हणालोय, की मला सध्या आता तरी या कार्यक्रमात भाग घ्यायचा नाहीये. सेम भाऊ कदम सरांचं सुद्धा आहे. भाऊ सध्या माझ्याबरोबर माझ्याच सिनेमात काम करत आहेत. तेही या कार्यक्रमात नाहीयेत. दोन माणसं या कार्यक्रमात नाहीयेत. याचं कारण तुम्ही जाणून घेतलं का?
उपाध्ये सर तुम्ही म्हणालात की, निलेश साबळेंच्या स्टेजवर माझा अपमान झाला आणि मीच तो केला असं तुमचं मत आहे. मला याबद्दल सांगायचं आहे की, 2014 ते 2015 च्या मध्ये हा एपिसोड शूट झाला. तेव्हा हा कार्यक्रम नवा होता. कार्यक्रमांच्या पहिल्या 50 भागांमधला हा एक भाग आहे. 10 वर्ष झाली डोक्यात हवा गेली हे जे वाक्य आहे, त्यामध्ये पुन्हा प्रॉब्लेम होतोय. कारण 50 एपिसोडच झालेले आहेत. त्यामुळे पहिल्या काही भागांमध्येच माझ्या डोक्यात हवा गेली असेल, असा मिश्किल टोलाही निलेश साबळे यांनी लगावला.
शरद उपाध्ये सर म्हणाले, मला पाणी देखील विचारण्यात आलं नाही. तर याबद्दल मी सांगतो की, झी मराठीने हे सगळं पाहाण्यासाठी एक कंपनी नेमलेली आहे. ती कंपनी गेली अनेक वर्ष हा कारभार उत्तमपणे राबवते. कंपनीचे किती लोक काम करतात, हे कार्यक्रमाच्या शूटिंगला आलेल्या प्रत्येकाला माहिती आहे. चॅनेलची माणसं आलेल्या कलाकारांना रिसिव्ह करण्यापासून मेकअप रुमपर्यंत नेण्याचं काम देखील करत असतात. क्लासिक स्टुडिओला याचं चित्रीकरण झालं होतं. तेथील सर्वात मोठी रुम सरांनी देण्यात आली होती. मेकअप रुममध्ये पाण्याच्या बाटल्या असतात. त्याच्या आयोजनासाठी मीटिंग देखील झालेल्या असतात.
इतर महत्त्वाच्या बातम्या
28 वर्षीय अडल्ट स्टार मृतावस्थेत सापडली, मृत्यूचं नेमकं कारण काय?