Mumbai Rain :  राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. अशातच मुंबईच्या पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून जोरदार पाऊस सुरु आहे. या जोरदार पावसामुळे अंधेरी सबवे पाण्याखाली गेला आहे. सबवे हा सखल भागात आहेत. अंधेरी सबवेखाली दोन ते तीन फूट पाणी भरल्यामुळं वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.

अंधेरी पोलीस आणि वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून अंधेरी सबवे बाहेर बॅरिकेट लावून बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. वाहतूक पोलिसांकडून अंधेरी सबवे बंद असल्यामुळे वाहन चालक गोखले पुलाचा वापर करावी असा सूचना दिला जात आहे. साकीनाका मेट्रो स्टेशन खाली देखील पावसाचे पाणी साठले आहे. त्यामुळं असल्फा घाटकोपर बाँड कडे वाहतूक धीम्या गतीने एका बाजूने चालत आहे.  त्यामुळे साकीनाका जंक्शन चारही  बाजूंची वाहतूक धिम्या  गतीने चालू आहे. साकीनाका जंक्शन या ठिकाणी api पाटील, psi आव्हाड आणि  अंमलदार हजर आहेत. 

हवामान विभागाचा अंदाज काय?

मुंबईसह कोकणात केवळ मध्यम पावसाची शक्यता पुढील दोन आठवड्यात जाणवणार असल्याची माहिती ज्येष्ठ हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी दिली आहे. तर संपूर्ण विदर्भ व सांगली सोलापूरधाराशिव जिल्ह्यात गुरुवार-शुक्रवार दिनांक 16 ते 17 जुलै ला दोन दिवस केवळ मध्यम पावसाची शक्यता जाणवते.तसेच उत्तर जळगांव जिल्ह्याच्या तालुक्यात आजपासुन 4 दिवस म्हणजे बुधवार दिनांक 16 जुलै पर्यंत अगदीच तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता जाणवत असल्याचे खुळे म्हणाले.

सध्या मान्सूनचा आस असणारा कमी दाबाचा पट्टा उत्तरेकडे सक्रिय असून राजस्थान पासून ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. आज विदर्भातील नागपूर अमरावती भंडारा व गोंदिया या जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट आहे. उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार, धुळे जिल्ह्यात पावसाच्या जोरदार सरी हजेरी लावणार असून जळगाव, नाशिक,छत्रपती संभाजीनगर ,जालना जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रातील घाट माथ्यावर पावसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने जोरदार हजेरी लावली. आता राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होणार असून काही जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता आहे. यावेळी वाऱ्यांचा वेग ताशी 30-40 किमी असून हलका ते मध्यम पाऊस राहण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सध्या राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल होत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातील बहुतांश भागात चांगला पाऊस झाला आहे. मात्र, काही भागात अद्यापही चांगला पाऊस झाला नाही. गेल्या 8 ते 10 दिवसापासून राज्यात पावसानं उघडीप दिल्याचं दित्र पाहायला मिळत आहे, शेतकरी पावसाची वाट बघत आहेत. 

महत्वाच्या बातम्या:

कुठं पाऊस तर कुठं उघडीप, पुढील आठवडाभर राज्यात कसं असेल हवमान? जाणून घ्या सविस्तर माहिती