Horoscope Today 20 December 2025: वैदिक पंचांगानुसार, आज 20 डिसेंबर 2025, आजचा वार शनिवार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आज मार्गशीर्ष महिना संपून पौष महिन्याची सुरूवात होतेय. त्यामुळे आजचा दिवस सर्व राशींसाठी खास आणि लाभदायक ठरण्याची शक्यता आहे. या दिवशी ग्रहांची हालचाल पाहता दिवस फार महत्त्वाचा आहे, आज ग्रहांचा दुर्लभ संयोगही होत आहे. ज्याचा परिणाम सर्व 12 राशींच्या लोकांवर दिसून येईल. शनिदेवांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस कसा असेल? कोणासाठी दिवस फलदायी ठरेल? 12 राशींचे आजचे राशीभविष्य (Horoscope Today) जाणून घ्या.
मेष रास (Aries Horoscope Today)
मेष राशीच्या लोकांनो आज व्यवसाय धाडसाची बाजू थोडी कमी पडेल, कधी कधी अतिचिकित्सा कराल
वृषभ रास (Taurus Horoscope Today)
वृषभ राशीच्या लोकांनो आज मनाचा मोकळेपणा दिलदारपणा विसरल्यासारखा वाटेल, मागच्या आठवणी ताज्या होतील त्यात रमून जाल
मिथुन रास (Gemini Horoscope Today)
मिथुन राशीच्या लोकांनो आज विद्यार्थी वर्ग थोडा अडचणीचा बनेल, नवीन काही शिकण्याची उर्मी त्यांनी ठेवायला हवी
कर्क रास (Cancer Horoscope Today)
कर्क राशीच्या लोकांनो आज अभ्यासाबाबत थोडा विसरभोळेपणा अनुभवास येईल आणि परीक्षेमध्ये अशी परिस्थिती होऊ नये म्हणून थोडी ध्यानाधारणा करावी
सिंह रास (Leo Horoscope Today)
सिंह राशीच्या लोकांसाठी आज कल्पकतेचा खजिना तुमच्याकडे राहील, कोणा एकाशी कायम मैत्री जमणार नाही
कन्या रास (Virgo Horoscope Today)
कन्या राशीच्या लोकांनो आज हातात जो विषय असेल, त्यानुरूप मित्र निवडाल, नोकरी व्यवसायात स्वतंत्र वृत्ती राहील
तूळ रास (Libra Horoscope Today)
तूळ राशीच्या लोकांनो आज आत्मविश्वासाने स्वकर्तृत्वावर पुढे याल, त्यामुळे कोणाची मदत घ्यायला आवडणार नाही
वृश्चिक रास (Scorpio Horoscope Today)
वृश्चिक राशीच्या लोकांनो आज घरामध्ये स्वतःच्या बुद्धीने काही कामे अशी निघतात की, त्यामुळे घरात तुम्हाला मान मिळेल
धनु रास (Sagittarius Horoscope Today)
धनु राशीच्या लोकांनो आज व्यवहारात थोडी तारतम्य बुद्धी आणि सारासार विचार वापरलात, तर कामात यश मिळेल
मकर रास (Capricorn Horoscope Today)
मकर राशीच्या लोकांनो आज तुमच्या दूरनिश्चयामुळे नेहमी हांजी करणारे तुमच्यापुढे नांगी टाकतील, या सर्व कामांमध्ये थोडी मानसिक आंदोलने अनुभवास येतील
कुंभ रास (Aquarius Horoscope Today)
कुंभ राशीच्या लोकांनो आज महिला स्वतःचा छंद जोपासतील, चारचौघातले वर्तन अतिशय विनम्र राहील.
मीन रास (Pisces Horoscope Today)
मीन राशीच्या लोकांनो आज प्रतिष्ठित लोकांच्या सहवासात याल, घरामध्ये चैनीच्या वस्तूंची खरेदी कराल.
हेही वाचा
Panchgrahi Yog 2026: आता म्हणाल 4 राशींचा खरा न्यू ईयर! शनिच्या राशीत पॉवरफुल पंचग्रही योग, वर्षभर दुप्पट वेगाने प्रगती, पैसा, नोकरी, प्रेम....
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)