अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि निक जोनस आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद लुटत आहेत. गेल्या सहा महिन्यांपासून ते लॉकडाऊनमुळे घरीच एकत्र आहेत. कोरोना व्हायरसच्या संकटात निक आणि प्रियांका आपला फॅमिली बिझनेस सुरु करण्याच्या विचारात आहेत. कोरोना व्हायरसमुळे लोकांना घरी बसावं लागत आहे. त्यामुळे या संकटात निक आणि प्रियांका आपला फॅमिली बिझनेस सुरु करण्याचा विचार करत आहेत.
निक जोनसने एका मुलाखतीत सांगितलं की, लॉकडाऊनमध्ये प्रियांका आणि मी खुपसारा वेळ एकत्र घालवला. आम्ही न केवळ क्वालिटी टाईम एकत्र घालवला तर एका फॅमिली बिझनेस प्लानचाही विचार करत आहोत. लॉकडाऊनच्या काळात निक आणि प्रियांकाने प्रोडक्विव काम केलं आहे. याबाबत निकने सांगितलं की, आम्ही एकाच वेळी विविध गोष्टींवर काम करत आहेत. अशारितीने हा एक फॅमिली बिझनेस झाला आहे. माझी इच्छा आहे की आम्ही सर्व एकत्र असू, परंतु याक्षणी बरीच कामं, बरीच स्वप्न आहेत. आम्ही सर्वजण खूप भाग्यवान आहोत, आयुष्यात आम्हाला असा एकत्र वेळ घालवता आला आहे.
प्रियांका आणि निक जोनस ज्या गोष्टीवर काम करत आहेत तो त्यांचा पहिला जॉईंट वेंचर असू शकतो. मात्र त्यांचे वैयक्तिकही अनेक कामं आहेत ज्यावर ते काम करत आहेत. प्रियांका चोप्रा सिनेमे, टेलिव्हिजनमध्ये बिझी आहे. तर निक जोनस आपल्या भावांसोबत जोनस ब्रदर्ससाठी म्युजिक बनवण्यात बिझी आहे. यावर्षी निकची काही गाणी रिलीज झाली आहेत.
इतर बातम्या