Nayanthara, Vignesh Shivan : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री नयनतारा (Nayanthara) आणि दिग्दर्शक विघ्नेश शिवन (Vignesh Shivan) यांनी 9 जून 2022  रोजी लग्नगाठ बांधून आपल्या आयुष्याच्या नव्या इनिंगला सुरुवात केली. नयनतारा आणि विग्नेश यांचा विवाह सोहळा चैन्नई येथे पार पडला. रजनीकांत, शाहरुख खान, मणिरत्नम, दिग्दर्शक बोनी कपूर, सूर्या, ए आर रहमान, एटली, कार्थी, वसंत रवी यांसारख्या सेलिब्रिटींनी  नयनतारा आणि विघ्नेश यांच्या लग्न सोहळ्याला हजेरी लावली. लग्न सोहळ्यातील नयनताराच्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. नयनतारा आणि  विघ्नेश यांच्या लग्नसोहळ्याचा अल्बम नेटफ्लिक्सवर रिलीज होणार होता. नेटफ्लिक्ससोबत नयनतारा आणि विघ्नेश यांनी 25 कोटींची डील केली होती. पण रिपोर्टनुसार, नयनतारा आणि निघ्नेश यांच्यासोबतची ही डील रद्द करण्याचा निर्णय नेटफ्लिक्सनं घेतला आहे. 


काय आहे प्रकरण? 
नयनतारा आणि विघ्नेश यांचा वेडिंग अल्बम हा नेटफ्लिक्सवर स्ट्रीम केला जाणार होता. पण नयनतारा आणि विघ्नेशनं वन मंख एनिवर्सरी निमित्त त्यांच्या लग्नामधील काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले. हे फोटो शेअर केल्यामुळे नयनतारा आणि विघ्नेश यांना 25 कोटींचं नुकसान होणार आहे, असं म्हटलं जात आहे. कारण हे फोटो शेअर केल्यानं नेटफ्लिक्स कंपनी नयनतारा आणि विघ्नेश  यांच्यासोबत केलेले डील रद्द करु शकते. 






गेल्या वर्षी नयतारा आणि विग्नेश यांचा गेल्या वर्षी साखरपुडा झाला. नयनतारानं 25 मार्च 2021 रोजी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या साखरपुड्याची बातमी चाहत्यांना दिली. या फोटोमध्ये नयनतारा रिंग फ्लॉन्ट करताना दिसत आहे. हा फोटो शेअर करुन नयनतारानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'माझ्या बोटांमध्ये माझी जीवनरेखा बांधली' असं कॅप्शन दिलं. नानुम राउडी धन या चित्रपटासाठी नयनतारा आणि विग्नेश यांनी एकत्र काम केलं होतं. नयनतारा आणि विघ्नेश शिवन यांचा नुकताच प्रदर्शित झालेला 'काथुवाकुला रेंदू कादल' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.  चित्रपटाचे दिग्दर्शन विघ्नेशने केले होते. तर नयनतारा, विजय सेतुपती आणि समंथा रुथ प्रबू या कलाकारांनी या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका साकारली.


हेही वाचा: