Emily In Paris: अशा क्वचितच काही सिरिज आहेत ज्यांनी संपूर्ण जगभरात आपला डंका वाजवला. ज्यांनी देशाच्या अर्थकारणासह थेट राजकीय कुजबूज वाढवली. Netflix ची 'एमिली इन पॅरिस'(Emily In Paris) ही वेब सिरिज जगभरात केवळ लोकप्रीयताच नाही तर दोन देशांच्या अर्थकारणाला बदलवून टाकलंय. अमेरिकेतून कामासाठी फ्रान्सच्या पॅरिस शहरात आलेल्या एमिलीनं आपल्या फँटसीनं जगभरातील प्रेक्षकांना भुरळ पाडली. केवळ प्रेक्षकच नाही तर एमिलीच्या या दुनियेत फ्रान्सचे राष्ट्राध्यक्षही रमले.
पॅरिसमधली सुंदर लोकेशन्स, फॅशन आणि लव्ह ट्रँगलला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. या सिरिजने एवढी हवा केली की फ्रान्सचं पर्यटनही झपाट्याने वाढत गेलं. आणि पॅरिसची ब्रँड व्हॅल्यूही वाढली. या सिरिजच्या क्रेझमुळं पॅरिसमधील घर खरेदीसाठी चौकशी वाढू लागली. आता या सिरिजचा पाचवा सिजनही प्रदर्शित झाला आहे. या सीझनलाही प्रेक्षकांचे भरभरून प्रतिसाद मिळताना दिसतोय. पण या सिरिजवरून फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष आणि रोममधील मेयर बोलू लागले आणि ही सिरिज आंतरराष्ट्रीय हेडलाइन बनली.
एमिली इन पॅरिसवरून फ्रान्स अन् रोममध्ये काय झालं?
नेटफ्लिक्सने पाचव्या सिझनची घोषणा करताना एमिली आता पॅरिसमधून रोमला शिफ्ट होणार असल्याचे संकेत दिले होते. नेटफ्लिक्सची ही या घोषणा मात्र, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमानुअल मॅक्रॉन यांना आवडली नाही. ऑक्टोबर 2024 मध्ये त्यांनी एका मुलाखतीत म्हणलं होतं आम्ही एमिलीला पॅरिसमध्ये ठेवण्यासाठी आम्ही जोरदार लढा देऊ. एमिली इन पॅरिस रोममध्ये नेण्यात काहीच अर्थ नाही असं ते म्हणाले होते. याच्यावर प्रत्युत्तर देताना रोमचे मेयर रॉबर्तो गुलतेर्री यांनी Tweet करत म्हटलं, " प्रिय, इमॅन्यूअल मॅक्रॉन एमिलीचं रोममध्ये उत्तम चाललंय. तुम्ही तिच्या मनावर कन्ट्रोल ठेऊ शकत नाही. तिचं तिला ठरवू दया." आणि या सगळ्यामुळे दोन्ही देशांत या शोची एकच चर्चा रंगली. सोशल मीडियावर चाहते आपली मत व्यक्त करू लागले. एमिलीने पॅरिसमध्ये राहायला हवं की रोममध्ये याची तुफान चर्चा झाली. त्यामुळे पाचवा सीजन घेण्याआधीच पुन्हा एकदा हा शो ट्रेंडिंगमध्ये गेला.
‘Emily in Paris’मध्ये एमिली शेवटी कोणासोबत असते, याची कुणालाच फारशी पर्वा नाही. पण तिच्या फॅशन सेन्सबाबत मात्र सगळेच उत्सुक आहेत. आता ती पूर्णपणे इटालियन रंगात रंगलेली दिसतेय. चार संपूर्ण सिझन्स फ्रेंच फॅशनने राज्य केल्यानंतर, नेटफ्लिक्सच्या या लोकप्रिय मालिकेत एमिली कूपरची भूमिका साकारणारी लिली कॉलिन्स इटालियन ड्रामामध्ये झळकत आहे. तिच्या जवळपास प्रत्येक लूककडे सध्या चाहत्यांचं लक्ष आहे.