Lakshmi Narayan Rajyog 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, 2025 या वर्षाचा शेवटचा आठवडा फार खास असणार आहे. कारण या दरम्यान अनेक राजयोग आणि शुभ योग जुळून येणार आहेत. यामध्ये लक्ष्मी नारायण राजयोगाचाही समावेश आहे. व्यवहाराचा दाता बुध ग्रह आणि धनसंपत्तीचा कारक शुक्र ग्रहाच्या युतीने लक्ष्मी नारायण राजयोग (Lakshmi Narayan Rajyog) जुळून येणार आहे. सध्या शुक्र ग्रह धनु राशीत संक्रमण करतोय. तसेच, 29 डिसेंबर 2025 रोजी बुद्धीचा दाता बुध ग्रहसुद्धा धनु राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग जुळून येणार आहे. यामुळे काही राशींचं भाग्य उजळणार आहे. या काळात तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ दिसून येईल. त्यामुळे या लकी राशी कोणत्या ते जाणून घेऊयात.
वृश्चिक रास (Scorpio Horoscope)
वृश्चिक राशीसाठी लक्ष्मी नारायण राजयोग लाभदायी ठरणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या धन भावाच्या स्थानी जुळून येणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला वेळोवेळी अचानक धनलाभ होऊ शकतो. तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. तसेच, समाजात देखील तुम्हाला चांगला मान-सन्मान मिळेल. घरात आनंदाचं वातावरण निर्माण होईल. या काळात तुमच्या वाणीवर तुमचं प्रभुत्व असेल. तसेच, तुमच्या मनातील ज्या इच्छा आहेत त्या या काळात पूर्ण होण्याची शक्यता आहे.
कन्या रास (Virgo Horoscope)
लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आल्यामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ फार शुभदायी असेल. हा राजयोग तुमच्या कुंडलीच्या चतुर्थ स्थानी असेल. त्यामुळे तुम्हाला भौतिक सुख संपत्तीचा चांगला लाभ घेता येईल. नोकरी आणि व्यवसायात प्रगतीच्या अनेक संधी तुमच्यासाठी निर्माण होतील. समाजात तुमचा मान-सन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. तसेच, जर तुम्हाला नवीन घर किंवा प्रॉपर्टी विकत घ्यायची असेल तर तुमच्यासाठी हा काळ फार लाभदायक ठरु शकतो.
मेष रास (Aries Horoscope)
लक्ष्मी नारायण राजयोग जुळून आल्याने मेष राशीच्या लोकांना चांगलाच लाभ मिळणार आहे. कारण हा राजयोग तुमच्या राशीच्या नवव्या स्थानी जुळून येणार आहे. त्यामुळे नशिबाची तुम्हाला चांगली साथ मिळेल. या काळात धार्मिक यात्रेला जाण्याचा योग जुळून येईल. व्यवसायाचा विस्तार अधिक वाढलेला दिसेल. तसेच, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना चांगला वाव मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हाला चांगलं यश मिळेल.
हे ही वाचा :
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)