Lavani Dancer Sayali Patil Get Offer For Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस 19'चा (Bigg Boss 19) सीझन मराठमोळ्या प्रणित मोरेनं (Comedian Praneet More) गाजवला. अशातच बिग बॉस हिंदीनं (Bigg Boss Hindi) निरोप घेतला आणि चर्चा सुरू झाली, 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss Marathi) सहाव्या पर्वाची. 'बिग बॉस मराठी'चं पाचवं पर्व तुफान गाजलं, त्यामुळे आता पाचव्या पर्वात कोण दिसणार? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. अशातच, 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात प्रसिद्ध नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) झळकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं. अशातच एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत बोलताना गौतमी पाटीलनं सर्व चर्चा फेटाळल्या. अशातच आता गौतमी पाटील नाहीतर, राज्यातील दुसरी सुप्रसिद्ध नृत्यांगणा 'बिग बॉस मराठी'च्या सहाव्या पर्वात झळकणार असल्याचं बोललं जात आहे. अशातच चर्चा रंगलेल्या नृत्यांगणेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.  

Continues below advertisement

Continues below advertisement

'बिग बॉस मराठी'च्या नव्या पर्वाची जशी चर्चा सुरू झाली, तसं गौतमी पाटीलचं नाव आघाडीर होतं. त्यामुळे महाराष्ट्रभरात गौतमी पाटीलचं नाव चर्चेत होतं. अशातच गौतमी पाटीलनं 'बिग बॉस मराठी'च्या घरात जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. त्यानंतर मात्र, या चर्चांना पूर्णविराम मिळाला. अशातच आता गौतमी पाटील नाहीतर आणखी एका नृत्यांगणेची चर्चा रंगली आहे. ती, नृत्यांगणा म्हणजे, सायली पाटील (Sayli Patil). 

सध्या सायली पाटीलचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये सायली पाटील म्हणतेय की, "मला बिग बॉस मराठीकडून दोन दिवसांपूर्वी मेल आलाय. तुम्ही इंटरेस्टेड आहात का? असा मेल आलाय. तर मी काय करू? मी बिग बॉसमध्ये जायला हवं का की नको? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा..."

नृत्यांगणा सायली पाटीलचा व्हायरल व्हिडीओ तिच्या ऑफिशिअल पेजवर नाहीतर तिच्या एका फॅन पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. तिच्या अधिकृत अकाउंटवर असा कोणताही व्हिडीओ नाही. त्यामुळे आता चाहत्यांचा संभ्रम आणखी वाढला आहे. 

नृत्यांगणा सायली पाटील कोण?

आपल्याला गौतमी पाटील माहीतच आहे, पण तिच्यासारखीच आणखी एक नृत्यांगणा संपू्र्ण महाराष्ट्रभरात प्रसिद्ध आहे, ती म्हणजे, नृत्यांगणा सायली पाटील. नृत्यांगणा सायली पाटील आपल्या अदाकारीनं आणि नृत्यानं महाराष्ट्रभरातील तरुणांच्या गळ्यातील ताईत बनली आहे. गौतमी पाटीलप्रमाणेच तीदेखील लोकप्रिय असून डान्सचे शो करते. सोशल मीडियावर सायली पाटीलच्या डान्सचे आणि अदाकारीचे रिल्स व्हायरल होत असतात.  

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Gautami Patil in Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी 6'च्या घरात गौतमी पाटील दिसणार? आधी हसली आणि मग म्हणाली...