Netflix Top 10 List 2025: 2025 वर्ष संपायला काहीच दिवस शिल्लक राहिलेत. नाताळ, नवीन वर्ष अशा  सुट्यांच्या काळात नेटफ्लिक्सवर मनोरंजनाची जबरदस्त मेजवानी पाहायला मिळत आहे. 2025 संपत असताना प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने ओटीटीकडे मोर्चा वळवलाय.याच पार्श्वभूमीवर नेटफ्लिक्सची ग्लोबल टॉप 10 मूव्हीज यादी सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. (Netflix Top 10 Trending)

Continues below advertisement

एकच भारतीय चित्रपट टॉप 10 मध्ये 

या यादीत 19 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या कोरियन सायन्स-फिक्शन डिसास्टर चित्रपट ‘द ग्रेट फ्लड’ने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे.अवघ्या दोन दिवसांतच हा चित्रपट प्रेक्षकांचा लाडका ठरला आणि 21 डिसेंबर 2025 रोजी तो थेट जगभरातील टॉप 10 यादीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला.भीषण त्सुनामीच्या  पार्श्वभूमीवर एका आई आणि तिच्या लहान मुलामधील भावनिक नात्याची हृदयस्पर्शी कथा यात मांडण्यात आली आहे. वर्षअखेरीच्या काळात भावनिक आणि भव्य आशय असलेला हा चित्रपट प्रेक्षकांना विशेष भावतो आहे.

Continues below advertisement

दरम्यान, ख्रिसमस आणि न्यू इयरच्या माहोलमध्ये नेटफ्लिक्सच्या टॉप 10 यादीत अ‍ॅक्शन, अ‍ॅनिमेशन आणि फेस्टिव्ह कंटेंटचा बोलबाला दिसून येतो. विविध देशांतील चित्रपटांनी या यादीत स्थान पटकावलं असलं, तरी एक गोष्ट विशेष लक्षवेधी ठरते.जागतिक टॉप 10 यादीत केवळ एकच भारतीय चित्रपट स्थान मिळवू शकला आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या या चित्रपटाने भारताचं प्रतिनिधित्व करत जागतिक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

नेटफ्लिक्सवरील टॉप 10 चित्रपट

-द ग्रेट फ्लड

-जेक पॉल विरुद्ध अँथनी जोशुआ (फाइट व्हिडिओ)

-द ग्रिंच (ख्रिसमस थीम असलेला अ‍ॅनिमेटेड चित्रपट)

-वेक अप डेड मॅन: अ नाइव्स आउट मिस्ट्री

-द क्रूड्स: अ न्यू एज (अ‍ॅनिमेटेड चित्रपट)

ख्रिसमस सिझनचा प्रभाव

सहाव्या क्रमांकावर ‘मर्डर इन मोनॅको’ ही डॉक्युमेंट्री आहे. ख्रिसमसचा सिझन असल्याने यादीत सणाशी संबंधित कंटेंटचा बोलबाला पाहायला मिळतो. सातव्या क्रमांकावर ‘हाउ द ग्रिंच स्टोल ख्रिसमस’, आठव्या क्रमांकावर ‘माय सीक्रेट सांता’ आहे. नवव्या क्रमांकावर नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्या ‘रात अकेली है: द बंसल मर्डर्स’ या चित्रपटाची एन्ट्री झाली आहे, तर दहाव्या क्रमांकावर ‘द सुपर मारियो ब्रदर्स मूव्ही’ आहे. एकूणच, जगभरातील नेटफ्लिक्स टॉप 10 यादीत फक्त एकच भारतीय चित्रपट स्थान मिळवू शकला आहे. ख्रिसमसच्या काळात तशा कंटेंटचीच सर्वाधिक क्रेझ असल्याचं या यादीतून स्पष्ट होतं.