Pune Land Scam Parth Pawar: यापूर्वी पार्थ पवारांच्या सहीचे पत्र दिले होते. पार्थ पवारांनी तेव्हा सांगितलं की ते माझ्या सहीचे पत्र नाही. 25 मे 2021 रोजी हा व्यवहार करून दिला आहे. ही सर्व कागदपत्र सरकार दरबारी पडला आहे. गेल्या 5-6 वर्षापासून हा घोटाळा सुरू आहे. एकच नोटरी वकिलाकडून हे बनवून घेतलंय. अजित पवारांना हे सर्व माहीत होतं आणि राज्यातले मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री या प्रकरणात प्रोटेक्ट करत असल्याचा खळबळजनक दावा माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार (Vijay Kumbhar) यांनी केलाय.
पुण्यातील जमीन घोटाळा प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे. पण राजकीय दबावामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल केला जात नाही, असा आरोपही त्यांनी केलाय. पार्थ पवार (Parth Pawar) यांच्या ‘अमेडिया’ कंपनीच्या कोरेगाव पार्क (मुंढवा) येथील 40 एकर जमीन विक्री प्रकरणात विजय कुंभार आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) एकत्र पत्रकार परिषद घेत हा दावा केला आहे.
Anjali Damania : अजित पवार यांचा आज राजीनामा घेतला नाही तर...
ही पावर ऑफ अटॉर्नी आहे, यात मुंढव्याची जागा असून यात प्रत्येक पेजवर पार्थ पवारांची सही आणि त्यांचा फोटो देखील आहे. 2021मध्ये याच जमिनींची पावर ऑफ अटॉर्नी आहे. ॲडव्होकेट तृप्ता ठाकूर यांनी हे पाठवलं आहे. तसेच दिग्विजय सिंह आणि शीतल तेजवानी यांच्या वकिलांनी ही पाठवलं आहे. तिने यात सर्व पाठवलं आहे, यात चाट देखील आहेत. संतोष हिंगणे आणि तृप्ता ठाकूर यांचे यात चॅटिंग आहेत. अजित पवारांचे पीए आणि तृप्ता ठाकूर यांचे चॅटिंग यात आहे. EOW चे अधिकारी आहेत वाघमारे त्यांचा देखील नंबर यात पाठवला आहे. हे सर्व पोलिसांसमोर देखील गेले आहे. तरी पार्थ पवारांवर गुन्हा दाखल नाही. जर आज अजित पवार यांचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही उद्या पुण्याला जाऊन त्यांचे नाव घाला असा इशारा देणार आहोत. असा आक्रमक पवित्रा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी यावेळी घेतलाय. शीतल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात झालेला हा व्यवहार आहे. यात तीन तीन OSD सहभागी आहे. असेही त्या म्हणाल्या.
Anjali Damania on Ajit Pawar : अजित पवार हे काही संत नाहीत
फक्त दिग्विजय पाटील आणि शीतल तेजवानी यांना अडकवलं जातंय आणि पार्थ पवार यांच्यावर काहीही कारवाई नाही म्हणून बहुतेक तृप्ता ठाकूर यांनी हे आम्हाला पाठवलंय. कलेक्टरला तो पत्ता तृप्ता ठाकूर पाठवते. आम्ही जी याचिका दाखल करणार आहोत त्याला पाहिले जबाबदार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे असतील. अजित पवार संत नाहीत ते असे म्हणतीलच की माहित नाही. अजित पवारांचे 3 अधिकारी सामील आहेत. त्यांचे नाव ढाकणे, राम चौबे, संतोष हिंगणे, विकास पाटील यांच्याशी चॅटिंग असल्याचे समोर आलं आहे. असा दावाही अंजली दमानिया यांनी केलाय.
आणखी वाचा