Opinion Poll: पुढच्या काही दिवसात पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशसह, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूर या राज्यात निवडणुकांमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. 10 मार्चला या सर्व पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल लागणार आहेत. दरम्यान, या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एबीपी न्यूज ने सी वोटर बरोबर या पाच राज्यांच्या सर्वे केला आहे. यामध्ये जनतेची मते जाणून घेतली असून, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळू शकतात, याचा अंदाज सांगितला आहे.


उत्तर प्रदेश


उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांवर मतदान होत आहे. सी वोटरच्या सर्वेनुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजपला 223 ते 235 जागा मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. तर समाजवादी पार्टीला 145 ते 157 जागा, बीएसपी ला 8 ते 16 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर इंडिया टीव्हीच्या सर्वेनुसार भाजपला उत्तर प्रदेशमध्ये 230 ते 235, समाजवादी पार्टीला 160 ते 165, बीएसपी ला 2 से 5 जागा आणि काँग्रेसला 3 ते 7 जागा मिळतील असा अंदाज सांगण्यात आला आहे.


DB Live च्या सर्वेनुसार 203 ते 211 जागा या समाजवादी पार्टीला मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त भाजपला 144 ते 152 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बीएसपी ला 12 ते 20 आणि काँग्रेसला 19 ते 27 जागा मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. तर  पोल ऑफ पोल्सच्या अंदाजानुसार भाजपला 221 ते 231 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर समाजवादी पार्टीला  147 ते 157 जागा, बीएसपी ला 7 ते 13 जागा तर काँग्रेसला 5 ते 9  जागा मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. पोल ऑफ पोल्सच्या अंदाजानुसार उत्तर प्रदेशमध्ये भाजप सत्तेत येण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. योगी आदित्यनाथ इहिसात रचण्याची शक्यता सांगण्यात येत आहे. कारण 1985 नंतर सलग दुसऱ्यांचा कोणालाच मुख्यमंत्री होता आले नाही.
 


पंजाब


पंजाबमध्ये एबीपी-सी वोटरच्या सर्वेनुसार काँग्रेसला 37 ते 43 जागा, आम आदमी पार्टीला 52 ते 58 जागा, अकाली दल 17 ते 23 जागा आणि भाजपला एक ते तीन जागा मिळण्याची शक्यता सांगण्यात आली आहे.  Republic P-MARQ च्या सर्वेनुसार काँग्रेसला 42 ते 48, आम आदमी पार्टीला 50 ते 56, अकाली दल 13 ते 17 आणि भाजप एक ते दोन जागा मिळण्याची शक्यता आहे.  पोल ऑफ पोल्स च्या सर्वेनुसार काँग्रेसला 43 ते 48 जागा तर आम आदमी पार्टी ला 49 ते 54, अकाली दल 14 ते 18 आणि भाजपसह मित्रपक्षाला एक ते तीन जागा मिळण्याची शक्यता आहे.  


गोवा


गोव्यामध्ये एकूण 40 विधानसभेच्या जागांसाठी निवडणूक लागली आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे राज्य लहान असले तरी राजकीय हालचाली सध्या मोठ्या प्रमाणावर गोव्यात सुरू आहेत. एबीपी न्यूज-सी वोटरच्या सर्वेनुसार भाजपला गोव्यात 32 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. त काँग्रेसला 20 टक्के, आम आदमी पार्टी 22 टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे. महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी (एमजीपी) आणि मित्रपक्षांना 8 टक्के आणि अन्य पक्षांना 18 टक्के मते मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. जागांच्या विचार केला तर भाजपला 19 ते 23 जागा, काँग्रेसला 4 ते 8 जागा, तर आप ला 5 ते 9 जागा मिळण्याचा अंदाज आहे.  महाराष्ट्रवादी गोमंतक पार्टी आणि मित्रपक्षांना 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्य पक्षांना 0 ते 4 जागा मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे.
 


उत्तराखंड


उत्तराखंड मध्ये C Voter च्या के सर्वेनुसार काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्येच जोराची लढत होण्याची शक्यता आहे. सर्वेनुसार भाजपला 31 से 37 जागा तर काँग्रेसला 30 ते 36 जागा, आप ला दोन ते चार जागा आणि अन्य पक्षांना 0 ते 1 जागा मिळण्याचा अंदाज आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला उत्तराखंडमध्ये 70 पैकी 56 जागा मिळाल्या होत्या. तर काँग्रेसला 11 जागांवर समाधान मानावे लागले होते. 


मणिपूर


मणिपूरमध्ये विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान होत आहे. 27 फेब्रुवारीला हे मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान हे 3 मार्चला होणार आहे. सी वोटरच्या सर्वेनुसार 35 टक्के मतदान भाजपला होण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 33 टक्के मतदान मिळण्याचा अंदाज आहे. तर एनपीएफ ला 11 आणि अन्य पक्षांना 21 टक्के मते मिळण्याचा अंदाज सांगण्यात आला आहे. जागांचा विचार केला तर 60 पैकी 23 ते 27 जागा भाजपला तर काँग्रेसला 22 ते 26 जागा, मिळण्याची शक्यता आहे. एनपीएफ ला 2 ते 6 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर अन्य पक्षांना 5 ते 9 जागा मिळण्याची शक्यता आहे.


महत्त्वाच्या बातम्या: