Neha Kakkar Pregnancy: प्रसिद्ध गायक नेहा कक्कर (Neha Kakkar) गाण्यांसह तिच्या खासगी आयुष्याबाबतही खूप चर्चेत असते. नेहा कक्कर आता जगातल्या टॉप गायिकांच्या रांगेत आलीय. जगभरात यूट्यूबवर सर्वाधिक पाहिल्या जाणाऱ्या गायिकाच्या यादीत नेहाचा समावेश केला जातो. एवढंच नव्हे तर, तिनं गायलेल्या गाण्याला रातोरात मोठी प्रसिद्धी मिळते. नेहा कक्कर नुकतीच तिचा पती रोहनप्रीत सिंह (Rohanpreet Singh) एका गाण्यात झळकली होती. या गाण्याला तिच्या चाहत्यांनी मोठी पसंती दर्शवली होती. मात्र, त्यानंतर नेहा कक्करच्या प्रेग्नंसीबाबात अनेक चर्चा सुरु झाल्या होत्या. या चर्चांवर नेहा कक्करनं आता मौन सौडलंय.
दरम्यान, नेहा कक्करनं तिच्या अधिकृत युट्यूब चॅनलवर 'लाईफ ऑफ कक्करर्स' या नावाची मालिका सुरू केलीय. या मालिकेचा पहिला एपिसोड 'काय नेहा कक्कर प्रेग्नेंट आहे?' असा चालवण्यात आला होता. या नवीन एपिसोडचा क्रिएटिव्ह डायरेक्टर दुसरा कोणी नसून नेहाचा भाऊ टोनी कक्कर आहे. या नव्या एपिसोडमध्ये कक्कर कुटुंबीय नेहाच्या प्रेग्नेंसीबद्दल आणि त्याच्याशी संबंधित अफवांवर बोलताना दिसत आहेत.
नेहानं व्हिडिओमध्ये असं म्हटलंय की, नेहाचं वजन वाढल्याचं तिच्या चाहत्यांच्या लक्षात आलं. त्यानंतर नेहाच्या प्रेग्नसीबाबत चर्चा सुरु झाल्या. 'लाइफ ऑफ कक्कर्स'च्या पहिल्या एपिसोडमध्ये नेहा कक्करनं लोकप्रिय सिंगिंग रिअॅलिटी शो 'इंडियन आयडॉल' का सोडलं? हे देखील सांगितलंय. या मालिकेदरम्यान नेहानं तिच्या आणि रोहनप्रीत सिंहच्या लग्नाच्या खऱ्या कारणाविषयी लिहिलेला लेख आणि व्हिडिओबद्दल देखील बोललं आहे. तसेच आपण प्रेग्नंट नसल्याचं तिनं उघडपणे सांगितलंय. तसेच तिला लवकरच वजन कमी करायचं असल्याचंही नेहानं सांगितलंय.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha
हे देखील वाचा-
- Preity Zinta Blessed with Twins: प्रीती झिंटा आई झाली, 46 व्या वर्षी जुळ्यांना जन्म, मुलाचं नाव जय, मुलीचं नाव काय?
- Vicky Kaushal Propose Katrina : 'मुझसे शादी करोगी' सलमानसमोरच विकीनं केलं कतरिनाला प्रपोज ; मग पुढे जे झालं ते...
- दाक्षिणात्य सुपरस्टार Suriya कोट्यवधींचा मालक; राजाप्रमाणे जगतोय आयुष्य, संपत्ती ऐकून व्हाल अवाक्